पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयम, योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 2, 2021

पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयम, योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

 पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयम, योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यात विभागीय, जिल्हास्तर व तालुकास्तरावरील शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित आहे. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात जिल्हा स्तरावर इयत्ता 12 वी नंतर उच्च शिक्षण घेणार्‍या सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच तालुकास्तरावर इ. 12 वी नंतर उच्च शिक्षण घेणार्‍या व इ. 10 वी  नंतर तंत्रशिक्षण पदविका  या अभ्यासक्रमासाठी फक्त केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेने महाविद्यालयामध्ये प्रवेश निश्चित केलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना या योजने अंतर्गत नीवन व नुतनीकरणाच्या विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. तरी सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याने विभागाच्या ीुरूरा.ारहरेपश्रळपश.र्सेीं.ळप  या संकेत स्थळावर स्वयंम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करणेबाबतचे आवाहन प्रकल्प अधिकारी, संतोष ठुबे यांनी केलेले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here