जळगावात शिवसेनेचा महापौर, भाजपाला धक्का - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 18, 2021

जळगावात शिवसेनेचा महापौर, भाजपाला धक्का

 सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती...

जळगावात शिवसेनेचा महापौर, भाजपाला धक्का

जळगाव :
महापौर निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन या विजयी झाल्या आहेत. भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा पराभव झाला आहे. शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन यांना 45 मते तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 30 मते मिळाली. शिवसेने उमेदवाराचा 15 मतांनी विजय झाला.

   जळगाव पालिकेत भाजपला शिवसेना जोरदार ‘दे धक्का’ दिला आहे. महापालिकेच्या महापौर  आणि उपमहापौर पदासाठी आज ऑनलाइन पद्धतीने निवडणूक झाली. भाजपचा एक गट निवडणुकीआधीच शिवसेनेला जाऊन मिळाला त्यामुळे आज जळगावात सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती  दिसून आली आहे. तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील हे विजयी झाले आहेत. निवडणूक जळगाव शहराची असली तरी दोन्ही पक्षातले अनेक नगरसेवक ठाणे आणि नाशिकमधून मतदान प्रक्रियेत ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे 27 नगरसेवक शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते. तसेच ते ठाण्यातील ‘द बाईक सूरज प्लाझा’ नावाच्या हॉटेलमध्ये थांबले होते.
   शिवसेनेच्यासोबत एमआयएमचे 3 आणि शिवसेनेचे 10 नगरसेवक आहेत. म्हणजेच एकूण 40 नगरसेवक या हॉटेलमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. राज्यातील सर्वांचे लक्ष जळगाव महापालिकेच्या निवडणुकीकडे लागले होते. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. यामुळे महापालिकेतील भाजपची सत्ता गेली आहे.

No comments:

Post a Comment