तलाठी कार्यालयातील मदतनीसाला, 1000 लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 18, 2021

तलाठी कार्यालयातील मदतनीसाला, 1000 लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

 तलाठी कार्यालयातील मदतनीसाला, 1000 लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः फेरफार नोंद करून उतारा मिळवून देण्यासाठी 1हजार रुपयांची लाच स्वीकारणारा कर्जत तालुक्यातील कोकणगाव घुमरी तलाठी कार्यालयातील मदतनीस म्हणून काम करणारा खाजगी कर्मचारी सचिन सुरेश क्षीरसागर वय35,रा मिरजगाव याला अ नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले आहे.
   तक्रारदार यांनी त्यांचे घुमरी गावातील वडिलोपार्जित शेतीचे वाटणी पत्र करुन त्या आधारे फेरफार नोंद कऱुन उतारा मिळणेकरिता तलाठी घुमरी,सजा कोकणगाव यांचे कडे अर्ज दिला होता. त्या आधारे तलाठी यांचेकडुन फेरफार नोंद कऱुन उतारा मिळवून देण्यासाठी तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणारे सचिन क्षिरसागर या खाजगी इसमाने तक्रारदारकडे 1हजार रूपये लाचेची मागणी केली होती तक्रारदार यांनी ला.प्र वि कडे दिलेल्या तक्रारीवरून दि 15मार्च2021 रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपी यांनी पंचा समक्ष 1हजार रुपये लाचेची मागणी केली सदरची रक्कम आज दि 18 रोजी आयोजित लाचेचा सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांचे कडुन पंचा समक्ष, जगदंब ईलेक्ट्रिकल समोर, नगर सोलापूर हायवे, मिरजगाव येथे स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडले आहे.
   सदर कारवाई हरिष खेडकर पोलीस उप अधीक्षक ला.प्र. वि.अहमदनगर,शाम पवरे पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि, पो ना रमेश चौधरी,विजय गंगुल, पो.अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, मपो अंमलदार राधा खेमनर,संध्या म्हस्के,चालक पो हवा हरुन शेख यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here