परिवहन आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची घोषणा.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 18, 2021

परिवहन आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची घोषणा..

 परिवहन आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची घोषणा..

वर्षभरात टोलनाके बंद !

नवी दिल्ली -  
देशभर फास्ट टॅगची संपूर्ण अंमलबजावणी करून येणार्‍या एका वर्षात टोल घेण्याची व्यवस्था पूर्णपणे रद्द केली जाईल, अशी घोषणा आज देशाचे परिवहन आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी  यांनी लोकसभेत केली आहे . याच बरोबर यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे ते म्हणजे जुन्या गाड्यांमध्ये मोफत जीपीएस सुविधा लावून देऊ, अशी सुध्दा घोषणा त्यांनी केली आहे.

    अमरोहाचे बसपा खासदार दानिश अली यांनी गढमुक्तेश्वरजवळील रस्त्यावर नगरपालिका हद्दीत टोल प्लाझाच्या बद्दल  प्रश्न उपस्थित केल्याने त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना नितीन गडगडी  म्हणाले कि  मागच्या सरकारमध्ये रस्ते प्रकल्पांच्या कंत्राटांमध्ये आणखी  मलाई टाकण्यासाठी शहराच्या सीमेवर असे अनेक टोल प्लझा बांधले गेले आहेत. हे निश्चितच चुकीचं आणि अन्यायकारक आहे असं प्रत्यूत्तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी लोकसभेत दिलंय. आता टोल प्लाझा हटवण्यात आले तर रस्ते बनवणार्‍या कंपन्या नुकसान भरपाई मागतील. परंतु, सरकारनं एका वर्षात सगळे टोल संपुष्टात आणण्याची योजना बनवली आहे असंही गडकरींनी यांनी उत्तर देताना म्हटलं आहे.
   तर पंजाबमधील ढिलवान-अटारी रस्त्याचं रुपांतर सहा लेनमध्ये करण्याचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासावेळी उपस्थित करण्यात आला होता. यावरही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिलंय. या रस्त्यावरचे ब्लॅक स्पॉट आणि अपघातांची शक्यता असणारे चार स्पॉट संपवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर सरकार दिल्ली-अमृतसर-कटरासाठी नवा एक्सप्रेस वे तयार करीत आहे, यामुळेही ढिलवान-अटारी रस्त्यावरील वाहतुकीची समस्या दूर होण्यास मदत होईल असं नितीन गडकरींनी म्हटलंय.

No comments:

Post a Comment