राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे मोदी सरकारविरोधात चूल मांडा आंदोलन.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 1, 2021

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे मोदी सरकारविरोधात चूल मांडा आंदोलन..

 राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे मोदी सरकारविरोधात चूल मांडा आंदोलन ..

इंधन व गॅस दरवाढ संतापजनक असून केंद्र सरकारला आता सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, त्यांना महागाई कमी करणे जमत नसेल तर त्यांनी खूर्च्या खाली कराव्यात, जनतेची लुबाडणूक करू नये, असेही रेश्मा आठरे  यांनी म्हटले आहे. दरम्यान, चूल मांडा आंदोलनात महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला असून हा उद्रेक दिल्लीपर्यंत पोहचवून केंद्र सरकारला धडा शिकल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही
- रेश्मा आठरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
गॅसची वाढ दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे, फेब्रुवारी महिन्यातच सलग 3 वेळा ही वाढ झाली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, गृहिणींना संसाराचा गाडा चालवणे अवघड झाले आहे, मोदींच्या केंद्र सरकारला अजिबात जनतेविषयी सहानुभूती नाही, त्यामुळे अखेर चूल मांडा आंदोलनाशिवाय आणि चूल मांडण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. त्यातच भर म्हणजे पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी हिवाळ्यामुळे ही वाढ झाल्याचा अजब दावा केला आहे, त्यामुळे संतापाची अधिकच भर पडली आहे, त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी च्या शहर जिल्हाध्य्क्षा रेश्मा आठरे  यांच्या नेतृत्वाखाली मोदींच्या पेट्रोलपंपावरील बॅनरखाली चूल मांडा आंदोलन करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. गेल्या तीन महिन्यांत एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 200 रुपयांनी वाढ झाली आहे. 1 डिसेंबर रोजी गॅस सिलिंडरचा भाव 594 रुपयांवरुन 644 रुपये इतका झाला होता. 1 जानेवारी रोजी पुन्हा 50 रुपयांची वाढ झाली यामुळे 644 रुपयांवरुन सिलिंडरचा दर 694 रुपये इतका झाला. 4 फेब्रुवारी रोजी पुन्हा वाढ झाल्याने हा भाव 719 रुपये इतका झाला. 15 फेब्रुवारी रोजी पुन्हा दरवाढ होऊन 719 रुपयांवरुन 769 रुपये इतका झाला. त्यानंतर आज पुन्हा 25 रुपयांची वाढ झाली आहे.याप्रसंगी  अपर्णा पालवे , लता गायकवाड , शितल राऊत ,सुनिता पाचारने , शितल गाडे ,उषा सोनटक्के ,आलिशा गर्जे,शोभा तांदले आदी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment