बजाज फायनान्सला मागितले 50 लाखाचे लोन ! टोळी गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 1, 2021

बजाज फायनान्सला मागितले 50 लाखाचे लोन ! टोळी गजाआड.

 बजाज फायनान्सला मागितले 50 लाखाचे लोन ! टोळी गजाआड.

बनावट ईमेल.. बनावट सिमकार्ड.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बनावट ई-मेल, बनावट सिम कार्ड वापरून बजाज फायनांस कंपनीकडे 50 लाखाचे लोन मागणार्‍या चार जणांच्या टोळीला गजाआड करून सायबर सेलच्या अधिकार्‍यांनी या टोळीने आणखी काही गुन्हे केले असल्याची शक्यता वर्तवली आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, दि 25 फेब्रुवारी रोजी प्रतिष्ठित डॉक्टरांनी फिर्याद दिली की, दि 23 जानेवारी रोजी कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे नावाचा वापर करून खोटे ईमेल आयडी तयार करून फिर्यादी यांचे नावाने व त्यांचे बनावट डॉक्युमेंट वापरून बनावट मोबाईल क्रमांकाचा वापर करून बजाज फायनान्सच्या फिर्यादी यांचे नावाने तयार केलेल्या बनावट कागदपत्र बजाज फायनान्स च्या ऑफिसला मेल द्वारे सादर करून 50 लाख रुपये लोनची मागणी केली आहे. यावरून तक्रारदार यांनी अज्ञात इसमाने विरुद्ध कायदेशीर फिर्याद दिल्याने त्यावरून सायबर पोलीस स्टेशन अहमदनगर मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ सायबर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी  यांनी गुन्ह्याबाबत तांत्रिक विश्लेषण करून तेजस प्रमोद मोगले वय 32 रा. सिडको महानगर औरंगाबाद, शुभम रमेश नंदागवळी वय 26 रा.गुलमंडी औरंगाबाद, अमोल सतीश सोनी वय 33 वर्ष रा.बसवंत नगर देवळाई औरंगाबाद, सतीश बापू खांदवे वय 27 रा. वाकोडी अहमदनगर, यांना गुन्हांमध्ये अटक करून त्यांचे कडे घेऊन याबाबत विचारणा केली असता त्यांनी संगनमताने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. व आरोपीतांकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल हॅन्डसेट जप्त करण्यात आलेले आहे. गुन्हांतील आरोपीतांना मा. न्यायालयाने दि. 2 मार्च पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड देण्यात आलेली असून आरोपी यांचेकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची श क्यता आहे
ही कारवाई मनोज पाटील पोलिस अधीक्षक, अहमदनगर, सौरभ अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली श्री मधुकर धोंडीबा साळवे, पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, योगेश गोसावी, उमेश खेडकर, मलिकार्जुन बनकर, दिगंबर कारखिले, राहुल हुसळे, विशाल अमृते, अभिजीत अरकल, राहुल गुंडू, अरुण सांगळे, गणेश पाटील, सम्राट गायकवाड, अमोल गायकवाड, वासुदेव शेलार, सविता खताळ, स्मिता भागवत, पूजा भांगरे, दिपाली घोडके, उर्मीला चेके, प्रीतम गायकवाड, सीमा भांबरे सर्व नेम. सायबर पोलिस स्टेशन, अहमदनगर यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here