आरोग्य विभागातील भरती वादाच्या भोवर्‍यात ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 1, 2021

आरोग्य विभागातील भरती वादाच्या भोवर्‍यात !

 आरोग्य विभागातील भरती वादाच्या भोवर्‍यात !

गैरप्रकार झालेली परीक्षा रद्द करण्याची मागणी...

अहमदनगर येथील परीक्षा खोलीत एका बाकावर किमान आठ ते दहा परीक्षार्थी एकत्रित पेपर सोडवत असल्याचे समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या छायाचित्रात दिसत आहे. पाठीमागच्या बाकावरही तशीच बैठक व्यवस्था असल्याचे छायाचित्रात दिसते. अनेक केंद्रांवर बैठक क्रमांक नसल्याने कोणी कुठेही बसा असा प्रकार होता, तर दापोली येथील परीक्षा केंद्रावर उमेदवार सकाळी 10 वाजता पोहोचले. मात्र, केंद्रच बंद होते. परीक्षेच्या वेळेपर्यंत केंद्रच उघडले नसल्याच्या तक्रारी राज्यातील अनेक केंद्रांवरून आल्या आहेत. सरळसेवा भरती असतानाही केंद्रांवर पोलीस संरक्षणही नव्हते, तर नाशिक येथील परीक्षा केंद्राबाहेर एक तास ताटकळत उभे राहावे लागल्याने उशिरा परीक्षा सुरू झाली. औरंगाबादमधील काहीकेंद्रांवर प्रश्नपत्रिका उशिरा पोहोचल्याचा आरोप आहे, तर काही केंद्रांवर गैरप्रकार झाल्याने उमेदवारांनी गोंधळ घातला. या प्रकरणावरुन ही भरती रद्द करावी अशी मागणी आता विद्यार्थी करू लागले आहे.


नवी मुंबई -
 राज्यातील बहुचर्चित आरोग्य विभागातील साडेआठ हजार पदाच्या भरतीसाठी रविवारी दी.28 फेब्रुवारी रोजी परीक्षा झाली मात्र ही परीक्षा आता वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे.
या परीक्षेच्या नियोजन करणार्‍या खासगी कंपन्यांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा वाद चव्हाटयावर आला आहे. राज्यातील परीक्षा केंद्रांवर नियोजनाअभावी मोठा गोंधळ उडाला, तर नागपुरातील काही केंद्रांवर प्रश्नपत्रिका फुटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.  या गोंधळामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. विशेष म्हणजे खासगी कंपनीमार्फत परीक्षा घेतल्याने हा गोंधळ झाल्याचा ठपका ठेवत परीक्षार्थी आणि काही संघटनांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना पत्रही देण्यात येणार आहे.करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये टाळेबंदी होती. त्यामुळे बाहेरून आलेल्या उमेदवारांचे हाल झाले. नागपूरमध्ये खानावळींपासून सारेच काही बंद असल्याने उमेदवारांची उपासमार झाली. पाचते ते सातशे किमीचा प्रवास करून आलेले अनेक उमेदवार परीक्षा केंद्रांच्या बाहेर सकाळी मिळेल तेथे अंग टाकलेल्या अवस्थेत दिसत होते.

No comments:

Post a Comment