जागतिक मराठी भाषादिन उत्साहात साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 1, 2021

जागतिक मराठी भाषादिन उत्साहात साजरा

 जागतिक मराठी भाषादिन उत्साहात साजरा

सारडा महाविद्यालयात रंगल्या मराठी शब्दांच्या गमती जमती


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
पेमराज सारडा महाविद्यालयात जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या पुण्याच्या मराठीच्या अभ्यासिका माजी मुख्याध्यापिका संजवणी कुलकर्णी यांनी सादर केलेल्या ‘शब्दरत्ने’ या मराठी भाषेचे विविध पैलू उलगडणार्‍या कार्यक्रमात मराठी कवी, साहित्यिकांच्या गाजलेल्या कविता व  लेखन सादर केल्यावर मराठी शब्दांच्या गमती जमतीही सादर केल्याने हा कार्यक्रम रंगला. सारडा महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने झालेल्या या ऑनलाईन कार्यक्रमात बीए व एमए चे विद्यार्थी घरूनच सहभागी झाल्याने व्यासपिठा समोर कोणीही नव्हते तरीही या कार्यक्रमाचा रंग वाढतच गेला.
महान कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन संजवणी कुलकर्णी व सारडा महाविद्यालाचे उपप्राचार्य डॉ.मिलिंद देशपांडे यांनी केले. यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रतिक्षा गायकवाड, मराठी संशोधन केंद्राच्या प्रमुख डॉ. महेश्वरी गावित, प्रा.डॉ.संगीता शेळके, प्रा.दया देठे, प्रा.डॉ.प्रकाश जाधव आदि यावेळी उपस्थित होते.
यावेळी संजवणी कुलकर्णी यांनी आपल्या शब्दरत्ने या कार्यक्रमात स्वातंत्र्यपूर्व काळातील वी.दा. सावरकर यांनी देशपभक्तीचे स्फुर्लिंग पेटवलेल्या कविता, वी.वा.शीरवाडकर, गदिमा, मंगेश पाडगावकर यांच्या सह अलीकडच्या काळातील विविध कवींच्या गाजलेल्या कविता तसेच साहित्यिकांचे गाजलेले  आपल्या अनोख्या शैलीत सादर केले. त्यास उपस्थित सर्वांनी दाद दिली.
यावेळी उपप्राचार्य डॉ.मिलिंद देशपांडे म्हणाले, सारडा महाविद्यालातील मराठी विभाग हा महाविद्यालयाच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे.कायम विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम व कार्याक्रमचे आयोजन करून साहित्तिक मेजवानी विद्यार्थ्यांना देत आहे. त्यामुळे महाविद्यालयातील पीएचडी धारक विद्यार्थाची संख्या वाढतच आहे.
प्रास्ताविकात डॉ. प्रतिक्षा गायकवाड म्हणाल्या, शहरात पुन्हा करोना वाढत आहे. महाविद्यालय सुरु झाले असले तरी विद्यार्थ्यांच्या संरक्षणा साठी हा कार्यक्रम ऑनलाइन घेण्यात आला आहे. गाजलेल्या साहित्यिकांनी आयुष्यभर मराठीची सेवा केल्याचं आजही त्यांचे साहित्य शाश्वत आहे. महाविद्यालय जागतिक मराठी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना आज अनोख्या मेजवानीचे आयोजन केले आहे.

No comments:

Post a Comment