विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाईचा बडगा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 1, 2021

विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाईचा बडगा

 विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाईचा बडगा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
खर्डा ः  अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक काळ हॉटस्पॉट राहिलेल्या जामखेडमध्ये दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झालेले दिसून येत आहे त्यानुसार तालुक्यातील खर्डा याठिकाणी शनिवारी सायंकाळी मास्क न लावता भटकणार्‍या अनेक नागरिकांना पोलीसाचा चाप देण्यास सुरुवात करताच अनेकांची भलतीच तारांबळ उडाले. समोर पोलीस पथक कारवाई करत असल्याचे पाहून अनेक जण धूम ठोकतात दिसून आले .यावेळी सोळा विनामास्क नागरिकांवर कार्यवाही करत एक हजार सहाशे रुपयांची दंड वसूल करण्यात आले
मागील वर्षीचा लॉकडाऊनचे अनुभव ताजे असतानाही खर्डा मध्ये नागरिक बेशिस्त वावरताना दिसून येत आहे .खर्डा शहरात विनामास्क भिडणार्‍याची संख्या जास्त आहे. मागील लॉकडाऊन बोध घेऊन आता शिस्तीचे दर्शन देणे गरजेचे आहे .पोलिस प्रशासन यांच्या सूचनांचे पालन न केल्यास केव्हाही कोरोनाचा भडका  उडू शकतो. यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलिस कॉस्टेबल शशी म्हस्के,विकास वांडरे यांनी दंडात्मक कारवाई दंड वसूल करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here