आजारी अवस्थेत असलेल्या बेवारस महिलेला कोठारींनी दवाखान्यात दाखल करून वाचवले प्राण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 1, 2021

आजारी अवस्थेत असलेल्या बेवारस महिलेला कोठारींनी दवाखान्यात दाखल करून वाचवले प्राण

 आजारी अवस्थेत अस


लेल्या बेवारस महिलेला कोठारींनी दवाखान्यात दाखल करून वाचवले प्राण

नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः शनिवार दिनांक 27/2/2021 रोजी सकाळी आठ वाजता राहुल अहिरे सर यांचा सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोन आला एक बेवारस आजारी महिला रिक्षा स्टँड नगर रोड येथे पडलेली आहे तुम्ही ताबडतोब या यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले त्या महिलेची अवस्था फार वाईट होती अशा वृध्द महिलेला स्वतःच्या रुग्णवाहिकेत आणून सरकारी दवाखान्यात दाखल केले असता तेथील कर्मचार्‍यांनी  ताबडतोब तिच्यावर उपचार चालू केले.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले आतापर्यंत मी एस टी स्टँड वरून 50 ते 60 बेवारस स्त्री पुरुष वृद्ध आणून दवाखान्यात जमा केले आहेत म्हणजे याचा अर्थ कोणीतरी त्यांना आणून सोडून देत आहे त्याच्याकडे प्रशासनाने लक्ष घालावे.
यावेळी पत्रकार यासीन शेख रिक्षाचालक अवि भुक्तर, पिनु मुळे, दीपचंद गुप्ता, किशोर वाकचौरे, राम यादव ,राम हगवणे ,शफिक शेख ,सिद्धार्थ पारवे, राहुल अहिरे सर ,अक्षय होडशिल, महेंद्र क्षीरसागर आदींनी मदत केली

No comments:

Post a Comment