अवतार मेहेरबाबाचा जन्मोत्सव मेहेरप्रेमींनी घरीच केला साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 1, 2021

अवतार मेहेरबाबाचा जन्मोत्सव मेहेरप्रेमींनी घरीच केला साजरा

 अवतार मेहेरबाबाचा जन्मोत्सव मेहेरप्रेमींनी घरीच केला साजरा

कोविडमुळे नगर सेंटरमध्ये होणारे विविध कार्यक्रम रद्द


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगरमधील सरोष पेट्रोल पंपाशेजारील मेहेरबाबा नगर केंद्रामध्ये दरवर्षी साजरा होणार अवतार मेहेरबाबाच्या जन्मोस्तव कार्यक्रम यावर्षी कोविडच्या शासनाच्या नियमामुळे करण्यात आला नाही तो मेहेरप्रेमींनी घरी साजरा केला तसेच या निमित होणारे 7 दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले नाहीत अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष डॉ मेहेरनाथ कलचुरी यांनी दिली
दरवर्षी  सप्तरंगी ध्वजाचे अनावरण करून जन्मोस्तव सुरवात होत असे तर सात दिवस प्रवचन,भजन, आरती प्रार्थना,सुगमसंगीत गायन,शास्त्रीय व भक्तीगीत गायन,पश्चिमात्य आणि इराणी बाबाप्रेमीचे गायन,वादन,अहमदनगर केंद्र व इतर बाबाप्रेमींचे विविध गुणदर्शन कार्यक्रम,कव्वाली गायन,भजने व अभंग वाणी तसेच नृत्य कार्यक्रम होत असत  नगरसह  देश विदेशातील भाविक दररोजच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहत असत. हे सर्व कार्यक्रम प्रशासनाने जारी केलेल्या नियमामुळे या वर्षी रद्द करण्यात आले व मेहेरप्रेमींनी बाबांचा 127 वा जन्मोत्सव घरीच साजरा करावा कोणीही सेंटरला येऊ नये असे आवाहन सेन्टरच्या विश्वस्तांनी केले आहे.

No comments:

Post a Comment