प्रा. भापकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 1, 2021

प्रा. भापकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

 प्रा. भापकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
गुंडेगाव ः नगर  तालुक्यातील गुंडेगाव  येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे प्रा.रंगनाथ भापकर उर्फ तात्या सर यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा भापकर परिवार व गौरव  समीती गुंडेगाव  यांच्या वतीने सेवापुर्ती गौरव सोहळा मोठया आनंदमय वातावरण संपन्न करण्यात आला.
सत्कारमुर्ती भापकर सर यांनी जिल्हा वास्तु संग्रहालयच्या  पदापासून कामाला सुरूवात केली. नंतर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेत नोकरी करत संस्था निरीक्षक  पद मिळाले आसून  त्यांनी आपल्या माळरानावर  शेतात डाळिंबाचे बाग तयार करून गोशाळा उभारणी केली आसून त्यानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेत चाळीस  वर्ष सेवा केली.
या कार्यक्रम प्रसंगी रंगनाथ भापकर सर यांनी सत्काराला उत्तर देताना प्रत्येक नाते मनात जपले पाहीजे. नात्यापेक्षाही विश्वासाला जास्त किंमत असते. त्यामुळे ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मारू नका. असे मत प्रतिपादन केले. तर
आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी चालेल पण नाती अशी मिळवा कि कोणाला त्याची किंमत करता येणार नाही असे मत व्यक्त केले आहे यावेळी रंगतारा व मंगेश भापकर लिखित  तात्यासाहेब ग्रंथाचे प्रकाशन सोहळा करण्यात आला आसून अनेक मान्यवर उपस्थिती होते
याप्रसंगी जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरूजी, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, प्रा.तुकाराम दरेकर सर, झेंडे सर, गुंडेगावचे  उपसरपंच संतोष भापकर,ग्रा.सदस्य नानासाहेब हराळ,  माजी संरपच संजय कोतकर, माजी उपसंरपच मंगेश हराळ, सुनील भापकर, डॉ.गजानन भापकर, संतोष कोतकर, संदिप धावडे, शेखर हराळ,तुकाराम भापकर, प्रकाश माळवदकर, पत्रकार संजय भापकर अदि उपस्थितीत होते
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंगेश भापकर  यांनी केले. तर भापकर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भापकर परीवार व गौरव सोहळा गुंडेगाव  समस्थ ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment