‘गिगाबाईट’च्यावतीने डोंगरे यांचा सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 1, 2021

‘गिगाबाईट’च्यावतीने डोंगरे यांचा सन्मान

 ‘गिगाबाईट’च्यावतीने डोंगरे यांचा सन्मान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील निमगाव वाघा ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी निवडीबद्दल व बहुमोल सामाजिक योगदानाबद्दल नानासाहेब डोंगरे यांचा केडगाव येथील गिगाबाईट कॉम्प्युटरच्या वतीने संचालक बाबासाहेब वायकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान अकोळनेरचे नूतन उपसरपंच प्रतीक शेळके यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अभिजीत पालवे, माजी सैनिक किरण फाटक, किसनराव बोठे, चंद्रकांत धोत्रे, गणेश धोत्रे यांच्यासह संस्थेतील विद्यार्थी उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देताना श्री. डोंगरे म्हणाले की, सामाजिक कार्याची सुरुवातीपासूनच आवड होती. याला आता राजकारणाची जोड मिळाली आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करताना येणार्या अडचणी दूर होण्यास मदत होईल. निमगाव वाघा गावातील ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला ग्रामपंचायतीचा सदस्य होण्याची संधी दिली. या संधीचे निश्चितच सोने करू. गावच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य राहील, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना श्री. वायकर म्हणाले की, श्री. डोंगरे यांनी सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, क्रीडा, तसेच व्यसनमुक्ती, वृक्षसंवर्धन यांसारख्या विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.

No comments:

Post a Comment