हिंगोलीतील त्या अल्पवयीन मुलीस न्याय! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 12, 2021

हिंगोलीतील त्या अल्पवयीन मुलीस न्याय!

 हिंगोलीतील त्या अल्पवयीन मुलीस न्याय! मुले संकटात! डायल करा 1098 !

चाईल्ड लाईन व एमआयडीसी पोलिसांकडून पालकांचा शोध.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः हिंगोली येथील बेवारस अल्पवयीन मुलीला एमआयडीसी पोलीस व चाईल्ड लाईन संयुक्त प्रयत्नाने न्याय मिळाला. तिच्या पालकांचा शोध घेऊन या मुलीस सुखरूप पणे पालकांच्या हवाली करण्यात आले. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पीआय सुखदेव कणसे व त्यांची टीम चाईल्ड लाईनचे टीम मेंबर प्रवीण कदम व स्वयंसेवक राहुल वैराळ यांचे परिश्रमाने मुलीच्या पालकांनी कौतुक करून धन्यवाद दिले आहेत.
सदर घटनेची हकीकत अशी की दि.10 मार्च ला एमआयडीसी पोलीस स्टेशन मधून 1098 या चाईल्ड लाईनच्या  हेल्पलाइन ला फोन लावून माहितीदेण्यात आली की, एक बेवारस अवस्थेत अल्पवयीन मुलगी आम्हाला सापडली आहे . तिला तत्काल काळजी, संरक्षण आणि निवार्‍याची गरज आहे. तरी आपण मदत करावी. माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब चाईल्ड लाईनच्या  कार्यकर्त्यांनी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन कडे धाव घेतली. तिथे गेल्यानंतर सदर मुली बद्दल माहिती पोलिसांकडून घेतली. टिम मेंबर प्रविण कदम  यांनी सदर मुलीची समुपदेशन करून तिला धीर दिला. त्याचा सोबत काही प्रकार घडला आहे कि नाही याची खात्री केली. आणि  ती सुरक्षित आहे की नाही याची खात्री केली.
पी.एस.आय. सुखदेव कणसे यांच्या मदतीने सदर मुलीला निवारा देण्यासाठी बाल कल्याण समिती अहमदनगर यांना पत्रव्यवहार करून निवार्‍यासाठी परवानगी मागण्यात आली.पी.एस.आय. कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीची वैद्यकीय तपासणी जिल्हा रुग्णालयात करून घेतली. कोरोना ची सुरक्षा पाहून कोरोना चाचणी केली. तिचा  लैंगिकतेचे सुरक्षितेचा पाहून  तिची यू.पी.टी. ची चाचणी घेतली. त्यानंतर मुलीला बाल कल्याण समितीच्या परवानगीने शासकीय बालगृह, अहमदनगर या ठिकाणी तात्पुरता स्वरूपाचा निवारा देण्यात आला.
सदर मुलीच्या पालकांच्या शोध घेऊन, त्यांच्या पाठपुरवठा वारंवार करण्यात आला. त्यामुळे मुलीचे पालक  हे चाईल्ड लाईन अहमदनगर येथे आले . त्यांच्याकडून माहिती समजले की मुलगी ही हिंगोली जिल्ह्यातील आहे. तिचा पालकांनी  रीतसर मुलगी ताब्यात मिळण्यासाठी अर्ज करून चाईल्ड लाईन ला मदत मागितल. त्यानुसार  त्या पालकांना बाल कल्याण समिती अहमदनगर  यांच्यासमोर हजर करण्यात आले. व बालकल्याण समितीने सदर पालकांची कागदपत्राची पाहणी करून ओळखीची  खात्री करून सदर अल्पवयीन मुलीस सुखरूप त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
शहरात परिसरात अनेकदा संकटग्रस्त मुले-मुली दिसून येतात. त्यातील काही बालक निराधार, एकटे असतात. काही छळ होतो, अशा संकटात असलेल्या सर्व 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी 1098 क्रमांकावर कॉल केल्यास मोफत मदत मिळते. अहमदनगर जिल्ह्यात मागील 17 वर्षापासून हा उपक्रम स्नेहालय या संस्थेअंतर्गत चाईल्ड लाईन या प्रकल्पाद्वारे सुरू आहे. ही हेल्पलाइन 24 तास सुरू असते.  तिथे फोन करून बालकां विषयी मदत मागितली तर नक्कीच मदत मिळते. तेथे 0 ते 18 वयोगटातील मुला-मुली साठी कार्य केले जाते_.

No comments:

Post a Comment