स्व.राठोड यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 12, 2021

स्व.राठोड यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न

 स्व.राठोड यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न

‘शिवसेना’ नेहमीच सर्वसामान्यांसाठी कार्यरत राहणारा पक्ष


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्व.अनिल राठोड यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच आवाज उठविला. नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजे, त्यांना त्याचे हक्क मिळाले पाहिजे, ही त्यांची अग्रही भुमिका असत. त्यांची शिकवण आपण आजही यापुढे आपल्या कृतीतून आचरणात आणली पाहिजे. यासाठी स्व.अनिलभैय्या यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन करुन सर्वसामान्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याचा या शिबीराच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे. शिवसेना पक्ष नेहमीच सर्वसामान्यांसाठी कार्यरत राहणार पक्ष आहे. नागरिकांच्या अडअडचणी सोडवून त्यांना सेवा देण्याचे काम यापुढेही असेच सुरु राहील, असे प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.
माजी आमदार स्व.अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त श्री साई हॉस्पिटल येथे मोफत नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, शिवसेना आणि अनिलभैय्या हे अतुट नाते होते. हिंदूत्व आणि शिवसेना पक्ष वाढीसाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. युवकांचे संघटन करुन त्यांना योग्य मार्गदर्शन करुन पक्षात सहभागी करुन विविध पदे बहला केली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांला मानाचे स्थान देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला. त्यामुळेच अनेकजण शिवसेनेशी जोडले गेले. नगरमध्ये शिवसेना रुजविणे आणि ती वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांचे कार्य युवकांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.
शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, शिबीराचे आयोजक माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, अनिल शिंदे, अनिल बोरुडे, योगिराज गाडे, मदन आढाव, गणेश कवडे, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, अशोक दहिफळे, सुरेश तिवारी, विशाल वालकर, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, शाम नळकांडे, गिरिष जाधव आदि उपस्थित होते.
माजी महापौर सुरेखा कदम, दत्ता कावरे, आशा निंबाळकर, रमेश परतानी, पारुनाथ ढोकळे, अंबादास शिंदे, दिपक खैरे, गौरव ढोणे, अरुण झेंडे, काका शेळके, अनिल लोखंडे, अभि अष्टेकर, शशिकांत देशमुख, मुन्ना गुरुड, मुन्ना भिंगारदिवे, दिपक कावळे आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.
 संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे आदिंनी मनोगतातून स्व.अनिलभैय्या राठोड यांच्या कार्याचा गौरव केला. या शिबीरासाठी आनंदऋषीजी नेत्रालयाचे सहकार्य लाभले. साई हॉस्पिटलचे व्यवस्थापक रमेश खेडकर, जालिंदर बोरुडे, डॉ.संजय शिंदे, प्रशांत शिंदे, राजाराम माने आदिंनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here