साईदीप हॉस्पिटलमध्ये आता अद्ययावत कॅन्सर उपचार विभाग कार्यरत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 22, 2021

साईदीप हॉस्पिटलमध्ये आता अद्ययावत कॅन्सर उपचार विभाग कार्यरत

 साईदीप हॉस्पिटलमध्ये आता अद्ययावत कॅन्सर उपचार विभाग कार्यरत

पुर्णवेळ तज्ज्ञांची सेवा, कॅन्सरवरील सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार उपलब्ध


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
विविध आजारावर दर्जेदार उपचारांसाठी नावाजलेल्या साईदीप हॉस्पिटलमध्ये आता कॅन्सरवर परिपूर्ण उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हॉस्पिटल मध्ये अद्ययावत कॅन्सर उपचार विभाग सुरू होत असून याठिकाणी अचूक निदान व परिणामकारक उपचार रूग्णांना मिळतील.  यात किमोथेरपी, टार्गेटेड किमोथेरपी, *इम्युनोथेरपी* व कॅन्सरवरील शस्त्रक्रिया करण्यात येतील,  अशी माहिती साईदीपचे चेअरमन डॉ.एस.एस.दीपक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साईदीप मधील कॅन्सर विभागात कॅन्सर तज्ज्ञ डॉ. दत्तात्रय अंदुरे, व पुण्याचे प्रसिद्ध  कॅन्सर सर्जन डॉ. भाग्यश्री खळदकर,डॉ.अमित पारसनीस, डॉ.पंकज क्षीरसागर हे पूर्ण वेळ सेवा देणार आहेत. सध्या विविध कारणांमुळे तसेच वाढत्या व्यसनाधिनतेमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. कॅन्सरमध्ये वेळीच निदान होणे आणि त्वरित उपचार महत्वाचे असतात.  रूग्णांना दर्जेदार उपचारांसाठी पुणे, मुंबई, चेन्नई,  बंगलोर अशा महानगरात जाण्याची गरज पडू नये, त्यांना नगरमध्येच माफक दरात चांगले उपचार मिळावेत म्हणून साईदीप हॉस्पिटलने सेवा विस्तार केला आहे. याठिकाणी उपचारांबरोबरच कॅन्सर प्रतिबंधासाठी व्यापक जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.  विशेषतः तरूणाईला व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत,  असेही डॉ.एस.एस.दीपक यांनी सांगितले.
कॅन्सर तज्ज्ञ डॉ. दत्तात्रय अंदुरे हे नगरचेच भूमिपुत्र आहेत. नाशिक येथे एमबीबीएस केल्यानंतर त्यांनी राउरकेला येथे डी.एन.बी. केले. त्यांनी मेडिकल ऑन्कोलॉजिचे उच्च शिक्षण पुण्यातील नामांकित रूबी हॉल क्लिनिक येथे पूर्ण केले. कॅन्सर तज्ज्ञ म्हणून त्यांनी आतापर्यंत नोबल हॉस्पिटल, पुणे, सातारा, चिपळूण, प्रवरा मेडिकल, लोणी, सह्याद्री हॉस्पिटल, कराड येथे सेवा दिली आहे. 10 हजारांहून अधिक किमोथेरपी, टार्गेटड किमोथेरपी व इम्युनोथेरपी त्यांनी केल्या आहेत. डॉ. अंदुरे यांच्या रूपाने नगरमध्ये प्रथमच पूर्णवेळ व एकमेव कॅन्सरतज्ज्ञ (किमोथेरपी, टार्गेटेड किमोथेरपी व इम्युनोथेरपी तज्ञ) उपलब्ध झाले आहेत. कॅन्सर विभागात रेडियशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. भूषण निकम असतील. रूग्णांवर  प्रवरा मेडिकल ट्रस्ट विळदघाट येथे रेडिएशन उपचार करण्यात येतील.
डॉ.अंदुरे यांनी सांगितले की, सध्या कॅन्सर आजाराचे प्रमाण वाढले आहे. समाजात या आजाराबाबत खूप समज गैरसमज आहेत. कॅन्सर शब्द ऐकला तरी रूग्णांची, नातेवाईकांची गाळण उडते. अनेक वेळा कॅन्सर झाला आहे, हे मानायलाच रूग्ण तयार होत नाही. त्यामुळे उपचार वेळेत मिळत नाही व  आजार बळावतो. अशावेळी रुग्णाचा मृत्युही ओढवतो. हे चित्र बदलणे नक्कीच शक्य आहे. कॅन्सर बाबत न घाबरता तपासणी, अचूक निदान केल्यास वेळीच प्रभावी उपचार करणं शक्य होते. यातून कॅन्सर पूर्ण बरा होऊ शकतो. आज आधुनिक उपचार उपलब्ध झाले आहेत. यासाठी वेळीच तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. रूग्णांना नगरमध्येच तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार आता मिळतील. त्यामुळे पुणे, मुंबईला जाण्याचा वेळ व पैसाही वाचू शकेल.  साईदीपमध्ये सर्व सुविधांनी सुसज्ज कॅन्सर विभाग उभारण्यात आला आहे. याठिकाणी अनुभवी मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट (कॅन्सर तज्ञ), कॅन्सर सर्जन, रेडिएशन तज्ज्ञ असल्याने कॅन्सरवरील प्रभावी उपचार रूग्णांना मिळतील असा विश्वास डॉ. अंदुरे यांनी व्यक्त केला. नगरसह शेजारील जिल्ह्यातील रुग्णांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॅन्सर उपचार योग्य दरात देऊन त्यांना व्याधीमुक्त करणे, त्यांच्या चेहर्यावर स्मितहास्य फुलवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न साईदीपमध्ये होतील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. यावेळी साईदीप हॉस्पिटलचे संचालक डॉ. आर.आर.धूत, डॉ.कैलास झालानी, डॉ. रवींद्र सोमानी, डॉ. निसार शेख, डॉ.व्ही.एन. देशपांडे, डॉ. अनिल कुर्हाडे, डॉ.इकबाल,  शेख, डॉ.शामसुंदर केकडे, डॉ हरमीत कथूरिया, डॉ संगीता कुलकर्णी , डॉ अश्विन झालानी, डॉ.राहुल धूत, डॉ.किरण दीपक, डॉ.वैशाली किरण, डॉ.अनिकेत कुर्हाडे, डॉ.कस्तुरी कुर्हाडे, डॉ.रोहित धूत, डॉ.पायल धूत आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment