अविनाश घुले पदाच्या माध्यमातून विकास कामांना चालना देतील - अशोकराव बाबर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 22, 2021

अविनाश घुले पदाच्या माध्यमातून विकास कामांना चालना देतील - अशोकराव बाबर

 अविनाश घुले पदाच्या माध्यमातून विकास कामांना चालना देतील - अशोकराव बाबर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः घुले परिवाराने नेहमीच सामाजिक कार्यात मोठे योगदान दिले आहे. स्व.शंकरराव घुले यांच्यानंतर अविनाश घुले यांनी त्यांचे हेच कार्य समर्थपणे सुरु ठेवले आहे. हमाल पंचायत, नगरसेवक, प्रतिष्ठान, मंडळे यांच्या माध्यमातून त्यांचे समाजसेवेचे व्रत सुरु आहे. अनेकांची कामे करत असतांना त्यांनी मोठा मित्र परिवार निर्माण केला आहे. त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना विविध पदे मिळत आहे. स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या माध्यमातून ते नगरमध्ये चांगले प्रकल्प आणुन विकास कामांना चालना देतील, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सदस्य अशोकराव बाबर यांनी केले.
स्थायी समितीच्या सभापतीपदी अविनाश घुले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार रयत शिक्षण संस्थेचे सदस्य अशोकराव बाबर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अंबादास बाबर, प्रा.कैलास मोहिते, भाऊसाहेब पांडूळे, नाथाजी राऊत, रामचंद्र दिघे, रंगनाथ खेंडगे, सुरेश कावळे, गोविंद सांगळे, बाबासाहेब काळे, शाकिर शेख, उबेद शेख, मधुकर केकाण सुरेश पठारे आदि उपस्थित होते. अविनाश घुले म्हणाले, ज्येष्ठांचे आशिर्वाद आणि मित्र परिवारांच्या सहकार्याने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. या माध्यमातून विविध पदेही मिळत आहेत, परंतु हे पद मिरविण्यासाठी नसून त्या माध्यमातून कामे झाली पाहिजे, ही आपली भावना आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here