बोठे काही बोले ना! लॉक काही उघडेना? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 22, 2021

बोठे काही बोले ना! लॉक काही उघडेना?

 बोठे काही बोले ना! लॉक काही उघडेना? उद्या संपतेय पोलिस कस्टडीची मुदत..

आयपॅड, मोबाईल आज फॉरेन्सिक लॅबकडे पाठवणार..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रेखा जरे हत्या प्रकरणा मागे उद्देश काय? फरार झाल्यापासून बोठे कुठे राहिला? त्याला सहकार्य कोणी केले? आयपॅड मोबाईल फोन लॉकचा कोड काय? बोठेचं उत्तर एकच “मला काही आठवत नाही” पोलिसांनी न्यायालया कडूनही दोनदा पोलीस कोठडी मिळवून ही बोठे काही बोलायला तयार नाही. रेखा जरे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी बाळ बोठेच्या पारनेर न्यायालयाने दिलेल्या पोलीस कोठडीची मुदत उद्या संपणार आहे. उद्या न्यायालयासमोर बोठेला हजर केल्यानंतर पोलीस आणखी पोलिस कस्टडी मागणार त्यावेळी न्यायालय पोलिस कस्टडी देणार की न्यायालयीन कस्टडी देणार आहे ? हे उद्या स्पष्ट होणार आहे.

फरार बोठेस अटक केल्यापासून बोठे हा पोलिसांना सहकार्य करीत नसल्याचे दिसून येत आहे. बोठेच्या आयपॅड, मोबाईल फोन मधून बरीच माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी लॉक बाबत विचारणा करूनही बोठेला  लॉक कोड आठवत नाही. पोलिसांनी त्यासाठी मुंबईत सायबर सेलच्या पोलीस पथकाला पाचारण करूनही लॉक उघडले गेले नाही त्यामुळे पोलिसांनी बोठेचा मोबाईल व बोठेचा मित्र तनपुरेचा व अन्य 7 मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे आज पाठवणार आहे.आयपॅडची तपासणी फॉरेन्सिक लॅब करणार आहे. बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी सागर भिंगारदिवे याला दिली होती. ही सुपारी 12 लाखाची असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पैशाचा व्यवहार कशा पद्धतीने झाला याचा सुद्धा तपास अंतिम टप्प्यात आला असल्याचे समजते तसेच फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणार्‍या वस्तूचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागणार आहेत.
रेखा जरे हत्याकांड प्रकरणांमध्ये पोलिसांनी सहा आरोपींना पकडले असले तरी अजून कोणाचा या गुन्हात समावेश आहे काय, याचीसुद्धा माहिती आता पोलिस बोठेकडून घेत आहेत. जरे यांचा खून सुपारी देऊन झाल्याने व त्यात पैशाचे व्यवहार झाल्यामुळे हे व्यवहार कोणी, कसे व कोणामार्फत केले, याचा तपास सुरू झाला आहे.
पोलिसांनी  बोठेच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे थेट पैशाचे व्यवहार कशा पद्धतीने झाले याचाही उलगडा आता लवकरच होणार आहे.  बोठेच्या घरातून अनेक वस्तू या गुन्हात पैशाचा व्यवहार कशा पद्धतीने झाला, याचासुद्धा तपास पूर्णत्वाकडे गेलेला आहे. जरे हत्याकांड प्रकरणांमध्ये अजून कोणाचा समावेश आहे, याचीसुद्धा माहिती आता घेतली जात आहे. त्यातच पैशाचे व्यवहार झाल्यामुळे हे व्यवहार कोणी, कसे व कोणामार्फत केले, याचा तपास सुरू झाला आहे. गेल्या तीन महिन्यापासून पोलिसांनी रेखा जरे यांच्या हत्याकांडाबद्दल जे जे काही पुरावे आहेत, ते गोळा करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 40 हून अधिक जणांचे जबाब घेतल्यामुळे पोलिसांच्या हाती अनेक माहिती आली आहे.

No comments:

Post a Comment