बाजारपेठेत सर्व सुविधांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक- शाम देडगांवकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 12, 2021

बाजारपेठेत सर्व सुविधांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक- शाम देडगांवकर

 बाजारपेठेत सर्व सुविधांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक- शाम देडगांवकर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कापड बाजार परिसर हा व्यापारी बाजारपेठ असल्याने या ठिकाणी जिल्ह्यातील विविध भागातून लोक येत असतात. या परिसरात सर्व प्रकारची दुकाने, ऑफिससे आहेत, परंतु स्वच्छता गृहाची मोठी कमतरता भासत. अनेक मोठ्या दुकानांनी जरी सोय असली तरी छोटे दुकानदार, त्यात काम करणारे कर्मचारी व नागरिकांची मोठी कुचंबना होत. याबाबत नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांना कल्पना दिल्यानंतर त्यांनी याबाबत तात्काळ मनपाच्या संबंधितांशी संपर्क करुन मयुर कंपाऊंड येथे नव्याने दोन स्वच्छतागृह बसविल्याने सर्वांची मोठी सोय झाली आहे. जिल्हाभरातून बाजार पेठेत येणार्‍या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. बाळासाहेब बोराटे यांनी केलेल्या प्रयत्नाने हे शक्य झाल्याने ते अभिनंदनास पात्र आहेत, असे प्रतिपादन शाम देडगांवकर यांनी केले.
कापड बाजार परिसरातील मयुर कंम्पाऊंड येथे नव्याने दोन स्वच्छतागृह बसविण्यात आल्याबद्दल नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या कापड बाजार व्यापारी असोसिएशनच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी परेश लोखंडे, विशाल वालकर, शाम देडगांवकर, किरण व्होरा, कमलेश आहुजा, ईश्वर मुथा, आदित्य गांधी, संदिप गांधी, कुणाल फिरोदिया, संभव काठेड, भागचंद रायसिंघानी, संजय गुगळे, संजय भंडारी आदि उपस्थित होते. याप्रसंगी बाळासाहेब बोराटे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण नेहमी तत्पर असतो. बाजारपेठेतील हा महत्वाचा प्रश्न होता. याबाबत व्यापारी मागणी केल्यानंतर तातडीने ही व्यवस्था केली आहे. कार्यक्रमास प्रतिक बोगावत, कुणाल नारंग, विशाल वैद्य, राजु मेवाणी आदिंसह व्यापारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment