सर्वांच्या सहकार्याने शहराच्या विकासासाठी योगदान देऊ- अविनाश घुले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 12, 2021

सर्वांच्या सहकार्याने शहराच्या विकासासाठी योगदान देऊ- अविनाश घुले

 सर्वांच्या सहकार्याने शहराच्या विकासासाठी योगदान देऊ- अविनाश घुले


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः हमाल-मापाडी व व्यापारी हा एक परिवार आहे. परिवारातील सदस्यांच्या पाठबळामुळेच आपणास विविध क्षेत्रात काम करण्याचे पाठबळ मिळते. हमाल-मापाडी यांच्या प्रश्नांबाबत आपण नेहमीच अग्रही भुमिका घेतली आहे. त्यांचे प्रश्न सोडवून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे. व्यापारी-हमाल यांच्यातील समन्वयातून प्रश्न मार्गी लागत आहे. मनपाच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी आपण योगदान देणार असून, मनपाच्या माध्यमातून हमाल-मापाडी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करु. आजच्या सत्काराने आपणास काम करण्यास पाठबळ मिळणार असल्याचे, प्रतिपादन मनपाचे नूतन स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी केले.
दाळ मंडई- आडते बाजार विभाग माथाडी कामगार यांच्यावतीने स्थायी समिती सभापतीपदी अविनाश घुले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हमाल पंचायतचे सहसचिव बाळासाहेब वडागळे, पतसंस्थेचे व्हा.चेअरमन नारायण गिते, लक्ष्मण वायभासे, सुनिल गर्जे, बबन तांदळे, तबाजी कार्ले, दत्तू भोजने, मधुकर केकाण, नवनाथ आटोळे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी  बाळासाहेब वडागळे म्हणाले, अविनाश घुले यांनी हमाल पंचायतीच्या माध्यमातून हमालांना त्यांचे हक्क  मिळवून दिले आहेत. त्यांच्या नेेतृत्वाखाली हमाल-मापाडी याचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. मनपाच्या स्थायी समिती सभापती पदी झालेली नियुक्ती ही आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद बाब असून, याही पदाच्या माध्यमातून ते नगर शहराच्या विकासात मोठे योगदान देतील. याप्रसंगी नारायण गिते, संतोष ताथेड, बाबुशेठ लोढा, कमलेश भंडारी आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अजित गुगळे, कमलेश भंडारी, कांतीलाल शिंगवी, स्वराज कामगार संघटनेचे योगेश गलांडे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment