पाण्याचे नियोजन व बचत भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 12, 2021

पाण्याचे नियोजन व बचत भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे

 पाण्याचे नियोजन व बचत भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे

डॉ. कुर्‍हाडे ः जलनियोजन संवर्धन, जतन वापर कार्यशाळेतून युवकांना पाणी बचतीचा संदेश

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जल, जंगल व जमीन वाचविण्यासह त्याच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. भविष्यात पाण्याला मोठे महत्त्व प्राप्त होणार असून, पाणी हे मनुष्याला लाभलेली अनमोल देणगी आहे. पाणी ही जागतिक समस्या बनत चालली असताना पाणीचे योग्य नियोजन व बचत भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन मारुतराव घुले पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुधाकर कुर्‍हाडे यांनी केले.
भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र, जलशक्ती मंत्रालय, आधार बहुउद्देशीय संस्था व जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने बोल्हेगाव फाटा येथील मारुतराव घुले पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जलनियोजन संवर्धन, जतन वापर कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य कुर्हाडे बोलत होते. प्रारंभी रोपांना पाणी अर्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून संध्या जोशी-पावसे, काकासाहेब म्हस्के कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एस. बांगर, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, जय असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, पोपट बनकर, आधारवड संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. अनिता दिघे, अ‍ॅड. सुनिल तोडकर, आरती शिंदे, नयना बनकर, डॉ. संतोष गिर्हे, डॉ.धीरज ससाणे, वैशाली कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी युवक-युवतींसाठी जल व्यवस्थापनावर निबंध व पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. तसेच जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महाविद्यालयातील महिला शिक्षिक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here