महादेव जानकर यांचे नेवासा येथे स्वागत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 1, 2021

महादेव जानकर यांचे नेवासा येथे स्वागत

 महादेव जानकर यांचे नेवासा येथे स्वागतनगरी दवंडी

माका - राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष महादेवजी जाणकर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याच्या दौरयांवर आले असता,रासपचे उत्तर महाराष्ट्रप्रभारी शरद बाचकर,जिल्हाप्रभारी नानासाहेब जुंधारे,जिल्हा प्रवक्ते संभाजी लोंढें,तालुकाअध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी इतर पदाधिकारयांच्या उपस्थित त्यांचे स्वागत केले.          याबाबत असे की,नेवासे तालुक्यातील प्रवरा संगम येथे लग्नसोहळ्यासाठी जानकर आले असता, त्यांनी देवगड तिर्थक्षेत्र ठिकाणी दत्ताचे,सदगुरु किसनगिरी बाबा,तसेच शांतीब्रम्ह सदगुरु भास्करगीरी महाराजांचे दर्शन घेतले.तालुक्यातील जय श्रीराम मित्र परिवार नेवासेचे मुख्य मार्गदर्शक संतोष काळे,गणेश वाळुंजकर,राजेन्द्र मुथ्था,सुधीर डौले,बापुसाहेब दारकुंडे,दिपक आगळे, दादासाहेब नाबदे,तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या जुन्यानव्या सरपंच तसेच सदस्यांनी,इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी,भेटी घेऊन जानकरांचे स्वागत केले.                                                                   याप्रसंगी जानकर यांच्या समवेत इतर जिल्ह्यातील,तालुक्यातील,रासपचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.नेवासे तालुक्यातील रासप पक्षाच्या संबधित मागील पुढील ध्येय धोरणाबाबतीत चर्चाही झाली असल्याचे तालुकाअध्यक्ष शिंदे यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here