लोकशाहीची पत गंगोत्री प्रदूषित होण्यापासून वाचली ः अ‍ॅड. गवळी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 1, 2021

लोकशाहीची पत गंगोत्री प्रदूषित होण्यापासून वाचली ः अ‍ॅड. गवळी

लोकशाहीची पत गंगोत्री प्रदूषित होण्यापासून वाचली ः अ‍ॅड. गवळी

मंत्री राठोड यांच्या राजीनाम्याचे पीपल्स हेल्पलाईनकडून स्वागत


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन वादात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याबद्दल राज्य सरकारच्या निर्णयाचे पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने स्वागत करुन, लोकशाहीची पत गंगोत्री प्रदूषित होण्यापासून वाचली असल्याची भावना अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्येनंतर मंत्री राठोड यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले. नुकतेच त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पोहरादेवी येथे महंतांसह मोठा जमाव एकत्र करुन स्वत: निर्दोष असल्याचा बनाव केला. त्यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा व धार्मिक स्थळांचा दुरुपयोग प्रतिबंधक कायद्याचा भंग केला होता. मंत्री राठोड यांच्या राजीनाम्यासाठी सर्व स्तरातून राज्य सरकारवर दबाव येत असताना आखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. या निर्णयाने स्त्री दास्य निब्बाणची प्रचिती आली असून, स्त्री लंपट व महिलांवार अत्याचार करणार्या व्यक्तींना पाठीशी घालणे योग्य नव्हते. मंत्री राठोड यांचा राजीनामा घेतला नसता, तर कौरभ सभेपेक्षा वाईट अवस्था राज्य सरकारची झाली असती असे, अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here