कर्जत पोलिसांची विशेष कामगिरी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 2, 2021

कर्जत पोलिसांची विशेष कामगिरी.

 कर्जत पोलिसांची विशेष कामगिरी.

गाड्यांच्या मूळ मालकांचा शोध घेते गाड्या दिल्या ताब्यात.



नगरी दवंडी

कर्जत-  कर्जत पोलीस स्टेशन च्या आवारात बेवारस/अपघात झालेल्या व बरेच वर्षांपासून पडून असलेल्या एकूण अंदाजे तीन लाख 8 हजार रुपये किमतीच्या असलेल्या एकूण 15 दुचाकी/तीनचाकी गाड्या त्यांचे मूळ मालकांचा 15 दिवस शोध घेऊन ताब्यात देण्यात आल्या.

          कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आपल्या अफलातून कल्पनेतून दैनंदिन कामकाजाशिवाय इतर विषयात विशेष लक्ष घालत पोलीस स्टेशन मधील दुचाकी वाहनांना त्याचा मूळ मालक मिळवून देत पोलीस स्टेशन स्वच्छ करण्याचा आगळा वेगळा उपक्रम राबवितानच चोरीस वाहन गेलेल्या मालकांनी आशा सोडलेल्या असताना त्यांना सुखद धक्काच दिला आहे.

                    कर्जत पोलीस स्टेशन मध्ये असलेल्या अनेक गाड्या पैकी 49 गाड्या बाबत शोध घेतल्यानंतर त्यातील 21 मूळ मालक सापडले, यासर्वाना एकत्र बोलवून 17 लोकांना गाड्या ताब्यात देण्यात आल्या. त्याची नावे खालीलप्रमाणे. 

1) निलेश नवनाथ मोरे रा आष्टी ता आष्टी जिल्हा बीड- (हिरो होंडा स्प्लेंडर गाडी),

2) दत्तात्रय नामदेव कदम रा कापरे वाडी ता. कर्जत, अहमदनगर - (पॅगो कंपनीची तीन चाकी गाडी),

3) सांगुळे योगेश गणेश रा ठाकूर पिंपळगाव तालुका शेवगाव, अहमदनगर -(बजाज कं ची cd 100 गाडी),

4) गणेश विनायक मोटे रा. बहिरोबा तालुका नेवासा, अहमदनगर (होंडा शाईन कं. ची गाडी),

5) उल्हास दिवाकर जगताप रा. नेवासा, अहमदनगर(बजाज डिस्कवर कं. ची गाडी),

6) एकनाथ मारुती बेरड रा. दरेवडी,अहमदनगर(हिरो होंडा कं. ची डिलक्स गाडी),

7) गंगाराम केरू डोंबाळे रा.. राक्षस वाडी ता. कर्जत,अहमदनगर(हिरो होंडा कं. ची पॅशन गाडी),

8) संतोष ज्ञाना मोरे रा. सांगवी आष्टी तालुका आष्टी, बीड. (बजाज ct 100 कं. ची गाडी),

9) बापू खंडू गलांडे रा. सटवाईवाडी, कर्जत,अहमदनगर(हिरो होंडा स्प्लेंडर5 कं. ची गाडी),

10) सचिन लक्ष्मण वाबळे रा. कारखेल, तालुका बारामती, पुणे(बजाज platina कं. ची गाडी),

11) आबा रंगनाथ खाडे रा. देऊळगाव तालुका श्रीगोंदा,अहमदनगर.(हिरो होंडा स्प्लेंडर प्लस कं.ची गाडी),

12) आश्रू मोहन सावंत रा. वरवंड तालुका dound, पुणे(TVS  ॲपाचे कं.ची गाडी)

13) अनिल बाजीराव शेळके रा. येरोडोली तालुका श्रीगोंदा,अहमदनगर(हिरो होंडा स्प्लेंडर कं. ची गाडी),

14) आशुतोष शिवाजी कावले रा. शहरटाकळी तालुका शेवगाव, अहमदनगर(हिरो स्प्लेंडर कं. ची गाडी),

15) गणेश बाळासाहेब भोईटे रा. सांगवी तालुका बारामती, पुणे (हिरो स्प्लेंडर कं. ची गाडी), या लोकांना गाडया ताब्यात मिळालेनंतर हे गाडी मालक आनंदी झाले आणि त्यांनी कर्जत पोलिसांचे आभार मानताना अनेक वर्षापासून आमची चोरीला गेलेली गाडी परत मिळेल ही आशा आम्ही सोडून दिली होती मात्र कर्जत पोलिसां मुळे आमची गाडी आम्हाला पुन्हा मिळाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, अनेकांचा तर यावर विश्वास ही बसत नव्हता. बाकीचे लोक आज उद्या येणार असल्याचे पोनी यादव यांनी सांगितले.

                 सदरच्या कामगिरीसाठी मा. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, यांचे मार्गदर्शनाखालीकर्जत पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, यांच्या विशेष प्रयत्नाने व पोलीस जवान उदय सगळगीळे, वैभव खिळे व इतर कर्मचार्याच्या सहकार्याने हे काम  करण्यात आले.                 

           पोलीस स्टेशनच्या आवारात वर्षानुवर्षे दुचाकी तीनचाकी पडलेल्या असतात कर्जत पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सर्वात प्रथम अस्ताव्यस्त पडलेल्या या गाड्या व्यवस्थित लावून घेऊन पोलीस स्टेशन चे रूप पालटले, समस्येच्या मुळा पर्यत जाण्याच्या कार्य पद्धती मुळे आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना साठी प्रसिद्ध असलेले पो नी चंद्रशेखर यादव यांनी बेवारस पडलेल्या वाहनांची पाळे मुळे खोदण्यास सुरुवात केली. या कामासाठी खुप कष्ट आणि वेळ लागला. कारण संबंधित गाडी मालकाचा पत्ता व्यवस्थित नव्हता. पत्ता मिळाला तरी गाडी दुसऱ्याच्या नावावर असायची, मोबाईल नंबर वेगळाच निघायचा. हे सर्व करून त्याचा संपर्क होत नसल्यास मग संबंधित पोलीस ठाण्यात संपर्क करण्यात आला. त्यानंतर मालकाला शोधून त्याला बोलावून गाडी बाबत खात्री करावी लागली. कागदपत्र पाहून पुढील कारवाई करण्यात आली.

No comments:

Post a Comment