महावीर इंटरनॅशनल केंद्राकडून स्व. गांधींना श्रध्दांजली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 24, 2021

महावीर इंटरनॅशनल केंद्राकडून स्व. गांधींना श्रध्दांजली

 महावीर इंटरनॅशनल केंद्राकडून स्व. गांधींना श्रध्दांजली


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सामाजिक कार्यात अग्रगण्य असलेल्या महावीर इंटरनॅशनलच्या अहमदनगर केंद्राचा शुभारंभ 22 वर्षापुर्वी दिलीप गांधी यांचे हस्ते मुकूंद मंगल कार्यालयात झाला होता. सस्थेचे निमंत्रीत सदस्यपदही त्यांनी स्विकारले होते व महावीर केंद्राच्या प्रत्येक उपक्रमास त्यांचे मौलिक सहकार्य होते. त्यांचे निधनाने संस्थेची मोठी हानी झाली असे विचार राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेशचंद्र बाफना यांनी व्यक्त केले.
झोन चेअरमन गौतमलाल बरमेचा व अध्यक्ष धनराज संचेती यांच्या उपस्थितीत महावीर केंद्र सदस्यांनी स्व.दिलीप गांधी यांना श्रध्दांजली अर्पण केली. नगरचे वीर-वीरा युवा-युवती व सावेडी तसेच कडा, श्रीगोंदा,नेवासा,औरंगाबाद संभागातील सर्व सदस्यांतर्फे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. जेष्ठ सदस्य सतीश चोपडा, सुवालाल ललवाणी, श्रेणिक नहार, अरुण पारख, आदिंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment