वृक्षरोपणाने माजी केंद्रीय राज्यमंत्री स्व. दिलीप गांधी यांना माजी सैनिकांची श्रध्दांजली
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने माजी केंद्रीय राज्यमंत्री स्व. दिलीप गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षरोपण करुन माजी सैनिकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. तपोवन रोड येथील अभिनव विद्या मंदिर येथे झालेल्या श्रध्दांजली कार्यक्रमास ह.भ.प. राम घुले महाराज, जय हिंद फाऊंडेशनचे शिवाजी पालवे, निवृती भाबड, शिवाजी गर्जे, भाऊसाहेब देशमाने, बन्सी दारकुंडे, रघुनाथ औटी, अंबादास बडे, शिवाजी खाडे, खंडेराव लेंडाळ, महादेव शिरसाठ, भगवान डोळे, अंकुश भोस, महादेव झीरपे, विठठल लगड, संतोष शिंदे, अमोल निमसे, मयुर नवगिरे, प्रसाद शिंदे, फकिरचंद वाळ, नामदेव तांदळे, ज्ञानदेव दाणी, दिपक भिंगारे आदि उपस्थित होते.
शिवाजी पालवे म्हणाले की, दिलीप गांधी याचे राजकारणातील कार्य देशभक्तीने भारावलेले होते. त्यांना आजी-माजी सैनिकांबद्दल त्यांना अभिमान व मोठी आत्मीयता होती. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान न विसरता येणारे आहे. आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच सहकार्य केले. जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनची सुरुवात देखील त्यांच्या हस्ते झाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. स्व. दिलीप गांधी यांचे विचार व कार्य नेहमीच स्फुर्ती देणारे असून, त्यांच्या नावाने लावलेले वृक्ष त्यांची नेहमीच आठवण करुन देणार असल्याचे निवृत्ती भाबड यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment