प्रगत कला महाविद्यालयाचे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर चमकले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 24, 2021

प्रगत कला महाविद्यालयाचे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर चमकले

 प्रगत कला महाविद्यालयाचे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर चमकले


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः प्रगत कला महाविद्यालयाच्या मूलभूत अभ्यासक्रम(फाउंडेशन) या वर्गातील विद्यार्थी जाकीर शेख याच्या चित्राची निवड कला क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या द बॉम्बे आर्ट सोसायटी च्या वार्षिक स्पर्धा प्रदर्शनात झाली असून हे चित्र 22 इंच बाय 30 इंच आकाराचे आहे. स्थिरचित्र (स्टील लाईफ) या विषयाचे हे चित्र कागदावर जलरंग वापरून पूर्ण करण्यात आले आहे. या चित्रांमध्ये फळांवरील व वस्तूंवरील छाया प्रकाशाच्या उत्कृष्ट परिणाम पहावयास मिळतो. अशी माहिती प्राचार्य नुरील भोसले यांनी दिली.
प्रगत कला महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी शादाब काझी हा मागील वर्षी आर्ट टीचर डिप्लोमा(एटीडी) उत्तीर्ण झाला व सर जे जे स्कूल ऑफ आर्टच्या शासकीय सीईटी टेस्ट मध्ये मेरिटमध्ये आला व त्यास यावर्षी आर्ट सोसायटी ऑफ इंडिया या नामांकित संस्थेच्या स्पर्धा प्रदर्शनात विद्यार्थी विभागामध्ये पारितोषिक प्राप्त झाले आहे. हे पारितोषिक उत्कृष्ट वास्तववादी चित्र या विभागात असून पाच हजार रोख व प्रशस्तीपत्रक असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. तसेच अभिजीत पाटोळे या प्रगत कलेच्या माजी विद्यार्थ्यास कलाकार विभागामध्ये द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया या स्पर्धा प्रदर्शनात त्याच्या व्यक्ती चीत्रास पाच हजार रोख व प्रशस्तीपत्रक अशा स्वरुपात पारितोषिक मिळाले आहे. अभिजीत पाटोळे जीऊरचे ही स्थानिक असून सर जे जे स्कूल ऑफ आर्ट येथे उच्च शिक्षण घेतले आहे. व त्यांना व्यक्तिचित्रण या विषयात बरेच पुरस्कार मिळाले आहे.
पारितोषिक प्राप्त प्रगत कलेच्या माजी विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव विनायक पंडित, रेवेन्यू डॉ. जाँन प्रभाकर, बेसिल काळसेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. व जाकिर सुभान शेख (फाउंडेशन) यांचा सत्कार केला आहे. यावेळी फाउंडेशन वर्गाचे वर्गशिक्षक महावीर सोनटक्के, संजय काळे, प्राचार्य नुरील भोसले उपस्थित होते.

No comments:

Post a Comment