पारनेरच्या आमदारांनी जपला धार्मिक ठेवा ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 1, 2021

पारनेरच्या आमदारांनी जपला धार्मिक ठेवा !

 पारनेरच्या आमदारांनी जपला धार्मिक ठेवा !

शासनाच्या नियमांचे पालन करत आ. लंके झाले वैष्णोदेवीला रवाना !


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर नगर विधानसभा मतदार-संघाचे राष्ट्रवादीचे आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या मार्गदर्शना खाली सालाबादा प्रमाणे या ही वर्षी पारनेर नगर मतदार संघातील चारशे भावीक भक्त सहकारी मित्रांना घेवून शनिवारी आमदार लंके शासनाच्या सर्व अटी व नियमांचे पालन करत व सर्व भावीक भक्तांच्या कोराना चाचणी पुर्ण करून,माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला रवाना झाले.
धार्मिक परंपरेचा वारसा लाभलेले आ.लंके हे गेले अनेक वर्षे धार्मिक अस्मिता जपत मोफत महीला मोहटा देवी दर्शन असो की, तुळजापुर, कोल्हापुर देवीचे दर्शन सातत्याने घडवीत आले आहेत.
अदिमाया आदिशक्तीवर असनारी अफाट श्रद्धेचे आमदार लंके यांचे अनेक दाखले या पुर्वी महाराष्ट्राने पाहीले आहेत.नवरात्र मासात नऊ दिवस निरंकार उपवास तरच अनवाणी पायाने मतदार संघातील व संघाबाहेर अनेक भाविक भक्तांना अनवाणी दर्शन घडविणे तसेच माता वैष्णोदेवीचा अवघड घाट बर्फातुन अनवानी पायाने चढणार्‍या या आमदारांची धार्मिक अस्मिता व श्रद्धा पाहावयास मिळते.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवणारे अनेक ग्रामपंचायत उमेदवार तसेच पारनेर नगर मतदार संघातील सर्वपक्षीय पदाधिकारी व सर्व सामान्य कार्यकर्ते यांना समवेत घेऊन तसेच येऊ घातलेली नगरपंचायत निवडणूक व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्या सहकारी मित्रांना देवीचा आशिर्वाद घडवीन्या साठी घेऊन जाणारे हे महाराष्ट्रातील अनोखे व्यक्तिमत्व असणारे आमदार निलेश लंके असावेत.
यावेळी आमदार लंके यांच्या समवेत दादा शिंदे,संदीप चौधरी, राहुल झावरे,संतोष ढवळे,बापुशेठ शिर्के,श्रीकांत चौरे,अरुण पवार, राजेंद्र शिंदे,संदीप सालके,दौलत गांगड,विपुल सावंत,बंटी दाते, प्रविण थोरात,सचिन पवार,दत्ता शिंदे प्रितेश पानमंद, प्रमोद गोडसे, रमेश गव्हाणे,संदीप रोहकले,दत्ता काकडे,आकाश पठारे,शिवाजी महाराज रेपाळे,अमीत जाधव, विजय तराळ यांच्या सह अनेक गावांमधील आमदार लंके यांच्या सहकार्यांनी या यात्रा कमीटीत आपापल्या गावातील भावीक भक्तांना माता वैष्णोदेवी दर्शनाच्या अयोजनासाठी योगदान दिले.

No comments:

Post a Comment