आज पासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 1, 2021

आज पासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू

 आज पासून कोरोना  लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोविड लस


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
आजपासून सुरू होणार्‍या कोरडा लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात 60 वर्षावरील वयोवृद्ध व 45 ते 59 वर्षांच्या दरम्यान त्यांना गंभीर आजार आहेत त्यांना कोवीड लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी ले-ुळप2.0 या पोर्टल वर नोंदणी करावी लागणार आहे. 1507 वर कॉल केल्यास लसी बद्दल माहिती दिली जाणार असून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र फोटो ओळखपत्र द्यावे लागणार आहे. खासगी रुग्णालयात या लसीकरण साठी 250 रु. आकारले जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्स रूग्णालयात कोविड लस टोचून घेतली आहे. यावेळी मोदी यांनी सर्व लाभार्थ्यांनी लस घ्यावी, असे आवाहन केले. आपण पहिला डोस घेतला आहे. कोविड-19 विरुद्धच्या जागतिक लढाईला बळकट करण्यासाठी  आमच्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी चांगले कार्य केले आहे. हे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. कोविड लस घेण्यास पात्र असलेल्या सर्वांना मी आवाहन करत आहे. एकत्रितपणे आपण भारत कोविड-19 मुक्त करुया.असेही मोदी म्हणाले.

No comments:

Post a Comment