शरद क्यादरांचे रामकृष्ण पतसंस्थेचे संचालकपद रद्द - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 19, 2021

शरद क्यादरांचे रामकृष्ण पतसंस्थेचे संचालकपद रद्द

शरद क्यादरांचे रामकृष्ण पतसंस्थेचे संचालकपद रद्द

नगर मर्चंट बँकेत थकबाकी नसल्याचे प्रतिज्ञापत्र बनावट

अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर मर्चंटस् बँकेची थकबाकी असतानाही ती नसल्याचे दाखवून शरद क्यादर रामकृष्ण पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले. त्यांच्या निवडीला लक्ष्मण बुरा यांनी हरकत घेतली. त्यांचे संचालकपद रद्द करण्याचा निर्णय आता उच्च न्यायलयातही कायम झाला आहे. शरद लिंगप्पा क्यादर यांचे प्रतिज्ञापत्र खोटे असल्याचे निदर्शनास आणून त्यांचे संचालकपद बुरा यांनी रद्द केले.
या आदेशाविरुद्ध क्यादर यांनी सहकार मंत्र्यांकडे अपील करून स्थगिती आणली.या आदेशाविरुद्ध बुरा यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून आव्हान दिले. त्यावर सुनावणी होऊन सहकार मंत्र्यांचा आदेश उच्च न्यायालयाने रद्द ठरविला. क्यादर यांच्यावर गुंन्हा दाखल करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता क्यादर यांच्याविरोधात खोट्या प्रतिज्ञापत्राचा गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here