गृहमंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 19, 2021

गृहमंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट

 गृहमंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट


नवी दिल्ली ः
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (19 मार्च) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यात काय चर्चा झाली याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी दिल्लीत संवाद साधत होते.नागपुरातील मिहान प्रकल्पाविषयी चर्चेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी मुंबईतील ताज्या घडामोडींविषयी चर्चा झाली अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन अनिल देशमुख यांनी भेट घेतली. मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंह यांची उचलबांगडी झाल्यानंतर अनिल देशमुखांची खुर्चीही धोक्यात असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
आज सकाळी मी दिल्लीत आलो होतो. विदर्भात, नागपुरात मिहान प्रकल्प सुरु आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या इंडस्ट्रींचा येण्याचा विचार आहे. त्यामुळे आमच्या  विदर्भात या इंडस्ट्री आल्या पाहिजेत, यासाठी पवार साहेबांची मदत घेण्यासाठी मी आलो होतो. पवार साहेबांना मिहान प्रकल्पाचे डिटेल्स दिले. त्यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा करत असताना, पवार साहेबांनी साहजिकच मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाची माहिती घेतली. असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. एनआयए आणि एटीएस या प्रकरणाचा सर्व तपास करत आहेत. त्यांना राज्य शासनाकडून सर्व मदत आहे. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. याचा संपूर्ण रिपोर्ट येत नाही, त्याची संपूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर बोलणं योग्य नाही. रिपोर्ट आल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई राज्य सरकार करेल अशी माहिती अनिल देशमुखांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here