माजी आ. भीमसेन धोंडे यांची वाईच्या कोहिनूर हळद निर्मिती कंपनीला भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 13, 2021

माजी आ. भीमसेन धोंडे यांची वाईच्या कोहिनूर हळद निर्मिती कंपनीला भेट

 माजी आ. भीमसेन धोंडे यांची वाईच्या कोहिनूर हळद निर्मिती कंपनीला भेट

उद्योगपती संदीप कोरडे यांनी केले स्वागत
कृषीला उद्योगाची जोड आवश्यक!
’भारत हा कृषिप्रधान देश आहे;किंबहुना 70 टक्क्यांहून अधिक लोक शेतीवर आपली गुजराण करतात. शेतीचा आधुनिक पद्धतीने विकास झाला पाहिजे. त्याचबरोबर त्याला आधुनिक तंत्र- यंत्रांच्या उद्योग व्यवसायाची जोड दिल्यास भारतीय अर्थव्यवस्था प्रगल्भ होईल असा या निमित्ताने विश्वास आहे..!
- मा.आ.भीमसेन धोंडेआष्टी-
शेतीसंबंधी प्रारंभी पासूनच आपल्या मनात रुची व आवड असणार्‍या माजी आमदार भीमसेन धोंडे यांनी आपल्या स्वतःच्या शेतीत विविध पीक पद्धतींचे प्रयोग राबविले आहेत त्यातून अनेक जणांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि आपली कृषीविषयक आवडही उत्पादनाच्या माध्यमातून पुढे नेली याच अनुषंगाने आज सातारा जिल्ह्यातील वाई येथील उद्योगपती संदीप रोकडे यांच्या कोहिनूर हळद कंपनीला भेट देत तेथील पाहणी केली यावेळी कंपनीच्यावतीने माजी आमदार धोंडे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांचा स्वागत केले.आष्टी,पाटोदा,शिरूरचे माजी आ.भीमसेन धोंडे यांनी आज सातारा जिल्ह्यातील वाई येथील उद्योगपती संदीप कोरडे यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेल्या कोहिनूर हळद निर्मिती कंपनीला सदिच्छा भेट दिली. यावेळी हळद निर्मिती बाबत विविध माहिती तेथील प्रशासन कर्मचारी आणि तज्ञांकडून यथोचित रित्या घेतली.माहिती घेत असताना आणि तेथील यासंबंधी विविध चर्चा होताना माजी आमदार धोंडे यांची कृषिविषयक आणि प्रक्रियेसंबंधी भावना आणि आवड पाहून तेथील कर्मचारी बांधव आहे अवाक झाले.

ह्या सदिच्छा भेटीदरम्यान हळद निर्मिती बाबत कंपनीचा उद्देश कृषी विषयक उत्पादन क्षमतेला भारतीय अर्थव्यवस्थेत दिलेले स्थान शेती आणि उद्योग यांचा विकास होण्याची गरज असल्याचे मत यावेळी माजी आमदार धोंडे यांनी व्यक्त केले.
   दरम्यान कोहिनूर हळद निर्मिती उद्योग समूहाच्यावतीने उद्योजक संदीप कोरडे यांनी माजी आमदार भीमसेन धोंडे यांचे स्वागत करण्यात आले यावेळी हरिष भुजबळ, दिलीप फरांदे ,अक्रूरशेठ कुदळे, धनंजय हिवरकर,उत्तम बोडखे, बाळासाहेब भुकन, तुषार काळे, रमेश गिरी त्यांच्यासमवेत होते.

No comments:

Post a Comment