महावितरण कंपनीचे खाजगीकरण करण्याचा केंद्राचा डाव ः तनपुरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 13, 2021

महावितरण कंपनीचे खाजगीकरण करण्याचा केंद्राचा डाव ः तनपुरे

 महावितरण कंपनीचे खाजगीकरण करण्याचा केंद्राचा डाव ः तनपुरे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

राहुरी ः महावितरण कंपनीचे खाजगीकरण करण्याचा केंद्राचा डाव असल्याने भविष्यामध्ये अदानी- अंबानी यांच्याकडे कंपनी गेल्यास शेतकर्‍यांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल असा आरोप राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे.
   ब्राह्मणी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते . ते म्हणाले की , यामुळे शेतकरी हितासाठी काही कटु निर्णय घ्यावे लागत आहेत . राज्यात महावितरण कंपनीची 60 हजार कोटी थकबाकी आहे . यावेळी ना तनपुरे म्हणाले की , राहुरी तालुक्यातील चेडगाव पूर्ण होणारा जिल्ह्यातील पहिला लिंक फिडर असून भागातील शेतकर्‍यांना गेल्या 4 ते 5 वर्षापासून मुळा उजवा कालव्याचे आवर्तन सुटले की या भागातील शेतकर्‍यांना वारंवार विजेचा होणारा त्रास लक्षात घेता महावितरणच्या अधिकार्‍यांनी सदर काम पंडित दिन यावर कायम स्वरूपी उपाय योजना करण्याबाबत घेऊन 1 9 लाख रुपये खर्चाच्या साडे तीन किलोमीटर दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेतुन काम हाती अंतराच्या लिंक फिडरचे काम अवघ्या 15 दिवसातझाले आहे . त्या फिडरचे लोकार्पण ब्राह्मणी येथील उपकेंद्रातील ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे हस्ते झाले . यामुळे चेडगाव भागातील शेतकर्‍यांचा पाट पाण्याची वेळी होणारा त्रास कायम स्वरूपी मार्गी लागला आहे.
ब्राह्मणी उपकेंद्रात बसविलेल्या लिंक फिडरचे उदघाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी संचालक नामदेवराव म्हसे होते . यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे , महावितरणचे उपअभियंता धिरजकुमार गायकवाड , डॉ राजेंद्र बानकर , केशव बेरड , चेडगावचे सरपंच संजय खरात , नितीन बाफना , सोमनाथ हापसे , बाळासाहेब शेळके आदि उपस्थित होते. चेडगाव ग्रामपंचायत येथे एकलव्य जयंतीनिमित्त आयोजित कलेल्या कार्यक्रम प्रसंगी सरपंच संजय खरात यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन प्रश्न मांडले.

No comments:

Post a Comment