दिलीप गांधींच्या अचानक निधनाच्या वृत्ताने मोठा धक्क बसला- एकनाथ खडसे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 25, 2021

दिलीप गांधींच्या अचानक निधनाच्या वृत्ताने मोठा धक्क बसला- एकनाथ खडसे

 दिलीप गांधींच्या अचानक निधनाच्या वृत्ताने मोठा धक्क बसला- एकनाथ खडसे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः भाजपाचे जेष्ठ नेते दिलीप गांधी यांनी आयुष्यभर भाजपचे निष्ठेने काम केले. त्यांच्या अचानक निधनाच्या वृत्ताने मोठा धक्क बसला आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्व.दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज सायंकाळी दिलीप गांधी यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. स्व.दिलीप गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी सुवेंद्र गांधी व सरोज गांधी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. यावेळी देवेंद्र गांधी, अनिल गांधी, सचिन पारखी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment