अलौकिक व अविस्मरणीय कामे करणारे दिलीप गांधी कायम स्मरणात राहतील- एन.डी.कुलकर्णी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 25, 2021

अलौकिक व अविस्मरणीय कामे करणारे दिलीप गांधी कायम स्मरणात राहतील- एन.डी.कुलकर्णी

 अलौकिक व अविस्मरणीय कामे करणारे दिलीप गांधी कायम स्मरणात राहतील- एन.डी.कुलकर्णी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः दिलीप गांधी यांनी पहिल्याच निवडणुकीत बलाढ्य नवनीतभाई बार्शीकर यांचा पराभव करून राजकारणात जोरदार एन्ट्री केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. लहानपणापासूनची दिलखुलास मैत्री जपणारे दिलीप गांधी यांनी आयुष्यभर जिद्दीने काम करत विकासाचे मोठे प्रकल्प उभारले. शहरातील उड्डाणपूलाच्या सुरवातीच्या कामासाठी वेळोवेळी सल्लामसलत केल्याने याकामात माझाही खारीचा वाट आहे. सार्वजनिक बांधकाम सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची स्थपना दिलीप गांधी यांच्या हस्तेच झाल्याने या संघटनेचा त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबध आहेत. असे अलौकिक व अविस्मरणीय कामे करणारे दिलीप गांधी कायम स्मरणात राहतील, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम सेवानिवृत्त कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे संस्थापक व माजी अधिक्षक अभियंता एन.डी.कुलकर्णी यांनी केली.
   सार्वजनिक बांधकाम सेवानिवृत्त कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने आयोजित शोक सभेत माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी एन.डी.कुलकर्णी बोलत होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देशपांडे, सुरेश बोरुडे, नंदकुमार परदेशी, गोरक्षनाथ घोडेस्वार, आदिनाथ खरात, शंकर कुलकर्णी, प्रमोद तरवडे आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी सुधाकर देशपांडे म्हणाले, खासदार म्हणून काम करतांना दिलीप गांधी यांनी गावागावात विकास कामे केली. सर्वसामान्य जनतेची प्रश्न सोडवली. शहरातील उड्डाणपूल मंजूर होण्यासापासून प्रत्यक्ष कामास सुरवात होण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर तो पाहण्यास ते आता नसणार. असे चांगले काम करणार्‍या व्यक्तिमत्वास कारोनाने सोडले नाही.

No comments:

Post a Comment