फिनिक्स फौंडेशनची निःस्वार्थ रुग्णसेवा ही ईश्वरसेवाच-डॉ. सौ. तनपुरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 4, 2021

फिनिक्स फौंडेशनची निःस्वार्थ रुग्णसेवा ही ईश्वरसेवाच-डॉ. सौ. तनपुरे

 फिनिक्स फौंडेशनची निःस्वार्थ रुग्णसेवा ही ईश्वरसेवाच-डॉ. सौ. तनपुरे

जालिंदर बोरुडे यांच्या कार्याचा तनपुरे यांच्याकडून सन्मान
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांची महाराष्ट्र राज्य बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी तर आदर्श नेत्रदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे यांनी सत्कार केला. यावेळी मा.खा. प्रसाद तनपुरे, किशोर गांगर्डे, पी.के. आभाळे, गणेश कवडे आदी उपस्थित होते.
    माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे म्हणाल्या की, सामाजिक कार्याच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे दुर्बल घटकांना आधार देण्याचे काम करीत आहे. कोरोना व महागाईच्या संकटात माणुसकीच्या भावनेने अनेक गरजूंना आरोग्यसुविधा देण्याचे अविरत सुरु असलेले त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. फिनिक्स फाऊंडेशनची निस्वार्थ रुग्णसेवा ही ईश्वरसेवाच असल्याचे त्या म्हणाल्या.
    मा.खा. प्रसाद तनपुरे यांनी टाळेबंदी काळात सर्वसामान्यांची व हातावर पोट असलेल्या कामगारांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली असताना, गरजू रुग्णांची गरज ओळखून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या धाडसाने फिनिक्स फाऊंडेशनने विविध शिबीरे घेतली. मागील आठ ते नऊ महिन्यात कोरोना काळात नियमांचे पालन करुन झालेल्या शिबीराचा तब्बल हजारो रुग्णांनी लाभ घेतला. तर अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. गरजू रुग्णांची पैश्यांमुळे परवड होऊ नये, यासाठी गोर-गरीब रुग्णांकरिता फिनिक्स फाऊंडेशन देवदूताची भूमिका पार पाडत असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना जालिंदर बोरुडे यांनी गोर-गरीबांचे प्रश्न सोडविण्याचा ध्यास घेऊन समाजात योगदान देत आहे. वंचितांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी या भावनेने फिनिक्स फाऊंडेशन योगदान देत असून, कोरोना काळात देखील गरजूंना अविरतपणे मदत व आरोग्यसेवा पुरविण्यात आल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment