सर्वसामान्य जनता व कार्यकर्ते हीच माझी खरी ताकद ः कर्डिले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 4, 2021

सर्वसामान्य जनता व कार्यकर्ते हीच माझी खरी ताकद ः कर्डिले

 सर्वसामान्य जनता व कार्यकर्ते हीच माझी खरी ताकद ः कर्डिले

नागरदेवळे ग्रामपंचायत सदस्यांच्यावतीने सत्कार

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः गेली 25 वर्षे आमदारकी, काही वर्षे मंत्रीपद, जिल्हा बँकेत संचालक हे सर्व मला माझ्या सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच मिळाले आजही ती जनता व कार्यकर्ते हीच माझी खरी ताकद आहे, असे प्रतिपादन माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केेले.
   जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल नागरदेवळे ग्रामपंचायत सदस्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी ग्रा.पं.सदस्य विजय बोंदर्डे, सदस्य आशिष बोंदर्डे, मयुर पाखरे, बुर्हाणनगर ग्रा.पं.सदस्य राजेंद्र पाखरे, अभिषेक पाखरे, सरपंच राम पानमळकर,  शेखर खेडकर, आयुब पठाण आदि उपस्थित होते.
   श्री.कर्डिले पुढे म्हणाले, सर्वसामान्य जनतेची सेवा, मतदारसंघात विकासाची कामे, कार्यकर्त्यांना योग्यवेळी दिलेला मान-सन्मान यामुळे माझी नाळ जुळलेली आहे. मंत्री झालो तेव्हा एवढे सत्कार झाले नाही पण बँकेच्या निवडणुकीत निवडून आलो हे शेतकरी, कार्यकर्ते, मतदारांना खूपच भावले. त्यांच्या भावनांचा आदर मी करतो, असे ते म्हणाले.
   यावेळी विजय बोंदर्डे  म्हणाले की, नागरदेवळे विकासासाठी कर्डिले साहेब यांचेच मोठे योगदान आहे. पाणी, रस्ते, वीज प्रश्नांस त्यांनी प्राधान्य दिले.विकासासाठी सरपंच राम पानमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व  कायम त्यांच्या मागे राहू, असे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here