शहापूर येथे रस्त्याच्या कामाचा शुंभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 4, 2021

शहापूर येथे रस्त्याच्या कामाचा शुंभारंभ

 शहापूर येथे रस्त्याच्या कामाचा शुंभारंभ


नगरी दवंडी/प्रतिनिधी

निंबळक ः जिल्हा परीषदेच्या माध्यमातून शरद झोडगे यांनी नागरदेवळे गटामध्ये दर्जेदार कामे केली  शेतकर्‍याच्या रस्त्याच्या अडचणी दूर करण्यासाठी वाडया वस्त्यापर्यत डांबरीकरणाचे रस्ते केले असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशीकांत गाडे यांनी केले .
   शहापुर (ता. नगर) येथील दत्त मंदिरासमोर रस्त्याच्या कामाचा शुंभारभ गाडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते . यावेळी गाडे म्हणाले नागरदेवळे गट विकासाकामापासून वंचित होता. खेडोपाडी, वाडया-वस्त्यावर रस्ते नव्हते , शासनाच्या योजनाचा लाभ शेतकरी गरजू कुटुंबा मिळत नव्हता . या चार वर्षामध्ये झोडगे यांनी गटामध्ये शासनाच्या सर्व योजना खेडया पर्यत पोहचवल्या व त्याचा लाभ मिळवून दिला. यावेळी जि. प. सदस्य शरद झोडगे, सरपंच देवराम भालासिंग, माच्छिंद्र कराळे , छगन लगड, भाऊसाहेब बेरड, नारायण धाडगे, सदाशिव धाडगे, कार्यकारी अभियंता भाऊसाहेब राऊत उपस्थित होते.

No comments:

Post a Comment