वीटभट्ट्यांची वसुली थांबवा, कुंभार समाज महासंघाची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 13, 2021

वीटभट्ट्यांची वसुली थांबवा, कुंभार समाज महासंघाची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

 वीटभट्ट्यांची वसुली थांबवा, कुंभार समाज महासंघाची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः मागील वर्षभरात कोरोनामुळे जिल्ह्यातीलबहुतांश वीटभट्ट्या बंद होत्या. आजही तशीच स्थिती आहे. त्यामुळेवीटभट्ट्यांकडील गौण खनिज स्वामित्वधन वसुली यंदा स्थगित करावी,अशी मागणी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसलेयांच्याकडे केली आहे.महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अशोक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कुंभार समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊबोरुडे, उपाध्यक्ष विलासराव सैंदारे तसेच शिवाजीराव भवाळ, सोपानराव सैंदारे,शिवाजी महाशिकारे, भारतभाऊ जगदाळे, माऊली राऊत, विनायक गायकवाड आदींनीजिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन यंदा वीटभट्टी चालकांकडूनस्वामित्वधन वसुली होऊ नये, अशी मागणी केली आहे.
   या निवेदनात म्हटले आहे की, कुंभार समाजातील वीटभट्टीधारकांनाशासकीय जीआर प्रमाणे 500 ब्रासपयर्ंत मातीची रॉयल्टी माफ आहे. आमच्या समाजातीलवीटभट्टीधारक हा दरवर्षी सरासरी 1 लाख ते 2 लाख विटा तयार करतात. बरेचसेविटभट्टीधारक हे छोटे उद्योगधंदे करतात. त्यामध्ये 500 ब्रॉसपेक्षाजास्त मातीचा वापर कुणीही करीत नाही. अशा स्थितीत 5 टक्के विटभट्टी धारकहे 500 ब्रॉसपेक्षा 100 किंवा 50 अतिरिक्त मातीचा वापर करत असतील. पण, त्यासाठीसर्व कुंभार समाजातील विटभट्टीधारकांना वेठीस धरून त्यांच्याकडूनप्रत्येकी 1000 ब्रॉस मातीचे रूपये 1 लाख 60 हजार रूपयेप्रमाणे स्वामीत्वधन म्हणून शासनखाती भरणा करण्यात यावा म्हणून प्रांत, तहसीलदार, सर्कल, तलाठी यांच्यामार्फतआमच्या कुंभार समाजातील विटभट्टीधारकांना नोटीस बजाविण्याचे काम चालूआहे. शासनास 31 मार्च अखेर शासकीय भरणा महसूल पोटी वसूल करणे गरजेचे असते.त्यासाठी आम्ही कुंभार समाजातील सर्व विटभट्टीधारक महसूल पोटीकाही रक्कम भरतच असतो. 2019, 2020, 2021 या कोविड-19 काळात विटभट्टी बर्याचशा जिल्ह्यातील बंद होत्या. आजही परिस्थिती तसीच आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनीप्रांत, तहसीलदार, सर्कल, तलाठी यांना वसूल स्थगिती करण्याचे आदेश द्यावेत तसेचआमच्यावर होणार्या अन्यायकारक स्वामित्वधनाच्या नावाखाली वसुलीस व नोटीस देण्यासस्थगिती द्यावी, अशी मागणी यात करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here