विनायकनगर परिसरात दुषित पाणीपुरवठा माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचा आयुक्तांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 13, 2021

विनायकनगर परिसरात दुषित पाणीपुरवठा माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचा आयुक्तांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा

 विनायकनगर परिसरात दुषित पाणीपुरवठा माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचा आयुक्तांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः प्रभाग क्र.14 मधील बुरुडगांव रोड, मांडगे मळा, नक्षत्र लॉन, विनायकनगर येथील परिसरात पाणी पुरवठा हा दुषित होत असल्यामुळे तेथील रहिवासी यांना पोट दुखी, जुलाब, गॅस्टो सारखा त्रास होत आहे. तसेच इतर साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  
    सदर भागातील पिण्याच्या पाणी पुरवठा होत असलेल्या टाकीची गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छता केलेली नाही ती लवकरात लवकर स्वच्छ करुन दुषित पाण्यासंदर्भात संबंधितांना योग्य ते निर्देश द्यावेत. हा दुषित पाणी पुरवठा बंद झाला नाही तर जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here