महिलांनी प्रत्येक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली - महापौर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 9, 2021

महिलांनी प्रत्येक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली - महापौर.

 महिला डॉक्टर, नर्स मदतनीसांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान.

महिलांनी प्रत्येक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली - महापौर.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः आज महिला विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान, खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हापरिषद अध्यक्ष, शिक्षीका, डॉक्टर, इंजिनिअर, पायलटर, पोलिस अधिकारी, अंतराळवीर, खेळाडू अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. घरातील कामे सांभाळून महिला विविध क्षेत्रामध्ये  काम करित आहेत. म्हणून प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एक स्त्री असते असे म्हटले जाते. स्त्री सन्मानाची सुरूवात आपल्या घरापासूनच केली पाहिजे तरच भारत देश प्रगती पथावर जाईल. असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी व्यक्त केले. गेल्या वर्षभरामध्ये जागतिक महामारीचे संकट संपूर्ण जगावर होते. कोरोनामुळे सर्व नागरिक भयभित झाले होते. नगर शहरामध्ये कोरोना रूग्णाजवळ कोणतेही नातेवाईकाला जाता येत नव्हते अशा काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता मनपाचे महिला डॉक्टर, औषध निर्माण अधिकारी,  नर्स ,आरोग्य सेविका यांनी कोवीड रूग्णांना चांगल्याप्रकारे उपचार करून त्यांना दिलासा दिला. आशा या कर्तव्यदक्ष महिलांचा महानगरपालिकेच्या वतीने महापौर बाबासाहेब वाकळे यांनी कोरोना योध्दा म्हणून सन्मानपत्र देवून सत्कार केला. या प्रसंगी बोलत होते
   पुढे वाकळे म्हणाले की, जागतिक महिला दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. अमेरिकेमध्ये 1908 साली कारखान्यात काम करणा-या महिला यांना भरपूर काम मजूरी कमी होती. या विरूध्द महिलांनी लढा पुकारला स्त्रीया संघटीत होवून महिलांच्या अधिकार मागण्यासाठी सामूहिक संघर्ष केला तो दिवस म्हणून हा जागतिक महिला दिन साजरा केला जातो.  
    महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागात काम करणा-या सर्वच महिलांनी कोवीड काळात चांगले काम केले आहे. महानगरपालिकेतील प्रत्येक विभागातील कर्मचारी ,अधिकारी यांनी कोवीड काळामध्ये चांगले काम केल्यामुळे कोवीड  प्रादूर्भाव रोखण्यास मदत झाली. कोवीड रूग्णांना महिला डॉक्टर, नर्स  व आरोग्य सेविका यांनी जिवाची पर्वा न करता उपचार केल्यामुळे रूग्णांना मोठा दिलासा मिळाला. मनपाने डॉक्टर ,आरोग्य सेविका यांनी संख्या कमी असल्यामुळे मानधनावर त्यांची नेमणुक करण्यात आली होती. मनपात मानधनावर काम केलेल्या   डॉक्टर, नर्स व आरोग्य सेविका यांना कायम करावे अशी त्यांची मागणी आहे. त्याबाबत निश्चितच त्यांना कायम करण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल. मा.शासनाकडून महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिला सक्षमीकरणासाठी अशा योजनांची माहिती घेवून त्याचा लाभ घेवून महिलांनी प्रयत्न करावा असेही ते म्हणाले.
   यावेळी, महिला डॉ. सुरूडकर, डॉ.आएशा शेख, डॉ.चेलवा, डॉ.ढापसे, डॉ.मनोरमा थोरात, डॉ.जयश्री रवराळे, शिल्पा ठोंबरे, डॉ.गिरीष दळवी , डॉ.शेख, औषध निर्माण अधिकारी वैशाली बागुल, जयश्री म्हसे ,सिस्टर खिलारी, नवगिरे, तसेच अंगणवाडी सेविका ,आरोग्य सेविका मोठया संख्येने उपस्थित होत्या.
   यावेळी महिला डॉ.सुरूडकर, डॉ.आएशा शेख, डॉ.चेलवा, डॉ.मनोरमा थोरात, डॉ.जयश्री रवराळे ,शिल्पा ठोंबरे , जयश्री म्हसे, सिस्टर खिलारी, यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी  महापौर साहेब यांनी जागतिक महिला दिना निमित्त महिलांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करून आमच्या कर्तव्याची दखल घेतली असे आम्ही समजतो. सत्कारामुळे नक्कीच महिलांमध्ये काम करण्याची उर्जा निर्माण होवून यापुढील काळात अधिक जोमाने काम करू नागरिकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू तसेच मानधनावरील डॉक्टर ,नर्स, आरोग्य सेविका यांना मनपात कायम सेवेत घ्यावे अशी मागणी केली. प्रस्ताविक औषध निर्माण अधिकारी वैशाली बागुल यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here