शेंडी शिवारात रस्ता लूट.. करणारे आरोपी गजाआड ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 9, 2021

शेंडी शिवारात रस्ता लूट.. करणारे आरोपी गजाआड !

 शेंडी शिवारात रस्ता लूट.. करणारे आरोपी गजाआड !


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगर-औरंगाबाद मार्गावर ट्रकमधून ओरीसा येथे नेसकॉफीची वाहतूक करणारे ज्ञानेश्वर गजरे व त्यांचा मित्र किरण गायकवाड यांना त्यांचे केबिनमध्ये घुसून कोयता व चाकूचा धाक दाखवून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देवून त्यांचे मोबाईल रोख रक्कम लुटणार्‍या 2 आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी गजाआड करून गुन्हा दाखल केला आहे.
    सदर घटनेची हकीकत अशी की, दिनांक 4 मार्चला एमआयडीसी पो स्टे येथे ज्ञानेश्वर गजरे यांनी फिर्याद दिली की, ते त्यांच्या मित्र किरण गायकवाड यांचेसह त्याचे ताब्यातील ट्रक (क्र एम एच 16 सीसी 0861) मधून ओरीसा येथे नेसकॉपी घेेवुन जात असताना पहाटे 4:30 वा.चे सुमारास औरंगाबाद हायवे रोड, शेंडी शिवार, अहमदनगर येथे थांबले असताना तीन इसम एका काळ्या रंगाच्या विना नंबरच्या पल्सर मोटारसायकल वर तेथे आले. त्यातील दोन इसम हे फिर्यादी यांचे ट्रकच्या केबिनमध्ये घुसले व त्याचे हातातील कोयता व चाकू फिर्यादी याचेवर गारून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देवून फिर्यादी व त्यांचा मित्र यांचे वडील 4000 रु. रोख रक्कम व त्याचे दोन मोबाईल फोन असा एकूण 46,000 रु. किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादीवरून एमायडिसी गुन्हा दाखल केला. एमआयडीसी पोस्टे चे सपोनि/ वाय.यु. आठरे सो यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी शेंडी चौक येथे येणार आहेत. त्यानुसार आठरे यांचे मार्गदर्शनाखाली सदाशिव कणसे पोना. महेश दाताळ, शाबीर शेख, युवराज गिरवले, संदीप खेंगट, शिंदे असा तपास पथक रवाना होऊन संशयित आरोपी संदीप दिलीप कदम वय 25 वर्षे रा.डोंगरगण ता.जि. अहमदनगर, शशिकांत सावंता चव्हाण वय 22 वर्षे रा.आंबीजळगाव ता.कर्जत जि.अहमदनगर यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे सदर गुन्ह्यातील मुद्देमाल तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल व कोयता मिळून आल्याने त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेतले असून फरार आरोपींचा शोध चालू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एन. कणसे करत आहेत.
   ही कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, मा.उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शन व सूचना प्रमाणे एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक युवराज आठरे, सदाशिव कणसे, महेश दाताळ, शाबीर शेख, युवराज गिरवले, संदीप खेंगट, जयसिंग शिंदे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here