खेळामध्ये ही युवकांना करिअर करण्याची संधी - रफिक मुन्शी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 25, 2021

खेळामध्ये ही युवकांना करिअर करण्याची संधी - रफिक मुन्शी

 अजीम नजीर काझी यांच्या यशाबद्दल सन्मान

खेळामध्ये ही युवकांना करिअर करण्याची संधी - रफिक मुन्शी
अहमदनगर ः युवकांचा मैदानी खेळाकडे कमी होत चाललेला ओढा ही चिंतेची बाब आहे. सोशल मिडियाच्या जमान्यात युवक हा मोबाईलमध्येच गुंतलेला दिसून येतो. त्यामुळे अकाली वयातच अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे युवकांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे. आज खेळांनाही ग्लॅमर निर्माण झाल्याने त्यातही करिअर करता येऊ शकते. सध्याच्या ‘आयपीएल’ जमान्यात युवकांना खेळामध्येही उत्तम संधी आहेत. अजीम नजीर काझी यानेही आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत अनेक क्रिकेट सामन्यात मिळविलेले यश हे त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. त्याचा पुढील काळ उज्वल असेल, यात शंका नाही, असे प्रतिपादन माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी यांनी केले.
    दिल्ली येथील विजय हजारे ट्रॉफी, हिमाचल व मुंबई येथील क्रिकेट सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करुन विविध पुरस्कार प्राप्त करणारे अहमदनगर येथील खेळाडू अजीम नजीर काझी यांचा मित्र परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, शरद पवार होमिओपॅथिक कॉलेजचे प्राचार्य डॉ.रिजवान, नफिस चुडीवाला, न्यामत चुडीवाला, हमजा चुडीवाला, जुनेद शेख, समीर खान, शहारुख रंगरेज, अतहर सय्यद, सरफराज चुडीवाला आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment