वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्राजक्त तनपुरे यांना निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 16, 2021

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्राजक्त तनपुरे यांना निवेदन

 वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्राजक्त तनपुरे यांना निवेदन

भिंगार शहर व नागरदेवळे भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः भिंगार शहर व नागरदेवळे भागातील पाणी पुरवठा नियमित सुरळीत करण्याचे निवेदन नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना देताना वंचित बहुजन आघाडी चे भिंगार शहर अध्यक्ष सागर चाबुकस्वार यांनी दिले.
   यावेळी अच्युत गाडे, विलास साळवे, भुषण कांबळे, अक्षय पाथरिया आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असून भिंगार व नागरदेवळे भागात अनियमित पाणीपुरवठा चालू आहे भिंगार शहरांमध्ये बारा दिवसांनी पाणी सुटते तर नागरदेवळे भागात पाणी आठ दिवसांनी सुटते पाणी हा माणसाचा ज्वलंत प्रश्न आहे आठ दिवसांनी व बारा दिवसांनी पाणीपुरवठा होत असला तरी पाणीपट्टी मध्ये कोणत्याही प्रकारची सवलत भिंगार कॅन्टोन्मेंट व नागरदेवळे ग्रामपंचायत देत नाही तसेच या बाबत ग्रामपंचायत व ग्राम विकास अधिकारी यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देतात अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे तर प्राजक्त तनपुरे यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित नागरदेवळे च्या कर्मचार्‍यांना सूचना दिल्या व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संपर्क साधून पाणीपुरवठा नियमित व सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment