मुलींना उमलत्या वयात संस्कार, योग्य मदत व पाठबळ मिळायला हवे : गुंदेचा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 16, 2021

मुलींना उमलत्या वयात संस्कार, योग्य मदत व पाठबळ मिळायला हवे : गुंदेचा

 मुलींना उमलत्या वयात संस्कार, योग्य मदत व पाठबळ मिळायला हवे : गुंदेचा

जय आनंद महिला मंडळाच्यावतीने महिला दिन साजरा

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः आजची मुलगी ही उद्याची कर्तृत्ववान महिला असते. तिला उमलत्या वयात संस्कार, योग्य मदत व पाठबळ मिळायला हवे. विशेषतः बालगृहात वास्तव्यास असलेल्या मुलींच्या पंखात बळ दिल्यास त्या नक्कीच गगनभरारी घेतील. त्यांच्या चेहर्यावर आनंद फुलवत महिला दिन साजरा करण्यातून अवर्णनीय आनंद मिळाला. अशा नारीशक्तीला भविष्यातही मदत करण्याचा प्रयत्न राहील अशी ग्वाही जय आनंद महिला मंडळाच्या अध्यक्षा सविता गुंदेचा यांनी दिली.
   जय आनंद महिला मंडळाच्यावतीने जागतिक महिला दिन चंद्रभान आठरे पाटील ग्रामनवोदय ट्रस्ट संचालित बालगृहातील मुलींसमवेत साजरा करण्यात आला. मंडळाच्या सेक्रेटरी स्नेहल कोठारी यांनी स्वतः घरी तयार करून आणलेला केक कापून सर्वांनी महिला दिनाचा आनंद लुटला. मंडळातर्फे सर्व 13 मुलींना नवीन ड्रेस तसेच बालगृहासाठी तेल, शेंगदाणे, मुरमुरे पोते व इतर साहित्य असा किराणा माल देण्यात आला. यावेळी बालगृह अधीक्षक पुष्पांजली थोरात, मंडळाच्या उपाध्यक्ष राणी मुथा, सेक्रेटरी स्नेहल कोठारी, सदस्या भारती गुंदेचा, गुंजन भंडारी, वृषाली रांका, पूजा गुंदेचा आदी उपस्थित होते. यावेळी भारती गुंदेचा यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त संस्थेला 1100 रुपयांची देणगी दिली. तसेच यावेळी मंडळाने संस्थेतील टिव्हीचा रिचार्जही करून दिला.
   संस्थेतील एका मुलाने आईवरील अतिशय भावपूर्ण कविता सादर केल्यावर उपस्थितांचे डोळे भरून आले.
स्नेहल कोठारी म्हणाल्या की, अतिशय सुंदर वातावरणात निराधार मुलांचा अगदी घरच्या प्रमाणे होणारा सांभाळ पाहून खूप आनंद झाला. येथील मुलामुलींच्या डोळ्यात दिसणारी चमक पाहता ते भविष्यात खूप मोठे कर्तृत्व गाजवतील असा विश्वास वाटतो.
   पुष्पांजली थोरात यांनी संस्थेची माहिती देताना सांगितले की, डॉ.अनिल आठरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही संस्था 2010 पासून विना अनुदानित तत्वावर कार्यरत आहे. मॅनेजिंग ट्रस्टी ड. विश्वासराव आठरे पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन संस्थेला लाभते. शरद काकडे हे संस्थेचे मॅनेजर असून सुमारे 3 एकराच्या स्वच्छ, सुंदर निसर्ग रम्य परिसरात मुलांचा घरच्या मायेने सांभाळ केला जातो. एक पालक असलेले तसेच अनाथ मुले-मुली संस्थेत आहेत. त्यांच्या शिक्षणाची सोयही करण्यात आली आहे. जय आनंद महिला मंडळासारखे दानशूर मंडळे, व्यक्ती, संस्था मोलाची मदत करीत असतात. अशा मदतीतूनच आम्हाला कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते.
   महिला दिनाचा असा आगळावेगळा आपुलकीचा कार्यक्रम झाल्याने सर्व मुलींच्या चेहर्यावर आनंद झळकत होता. शेवटी उपाध्यक्ष राणी मुथा यांनी आभा

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here