वाडेगव्हाणच्या उपसरपंचपदी रवींद्र शेळके यांची बिनविरोध निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 16, 2021

वाडेगव्हाणच्या उपसरपंचपदी रवींद्र शेळके यांची बिनविरोध निवड

 वाडेगव्हाणच्या उपसरपंचपदी रवींद्र शेळके यांची बिनविरोध निवड

सभापती गणेश शेळके यांनी केले अभिनंदन

नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः पारनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाणार्‍या वाडेगव्हाण येथील उपसरपंच पदासाठीची निवडणूक बिनविरोध झाली आहे यामध्ये उपसरपंच पदी रवींद्र श्रीधर शेळके यांची निवड करण्यात आली आहे.
   वाडेगव्हाण येथे उपसरपंच पदाचा राजीनामा 1 महिन्यापूर्वी दिला असल्याने हे पद रिक्त झाले होते त्यानंतर या पदासाठी निवडणूक प्रक्रिया प्रशासनाने राबवली होती त्यानुसार दि.15 रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत रवींद्र श्रीधर शेळके यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी घोषित केली यावेळी  गावातील विकासकामांना महत्त्व दिले जाणार असून गावात शासनाच्या विविध योजना पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांच्या माध्यमातून राबविल्या जाणार आहे तसेच आपल्या कार्यकाळात मध्ये गावातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती नवनिर्वाचित उपसरपंच रवींद्र शेळके यांनी दिली आहे यावेळी शेळके यांची उपसरपंच पदी निवड झाल्या नंतर त्यांचे पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी अभिनंदन केले.
   यावेळी सरपंच बाळासाहेब सोनवने, माजी उपसरपंच उध्दव शेळके,माजी सरपंच संध्याताई शेळके,चेअरमण प्रमोददादा घनवट,माजी सरपंच संतोष शेळके, व्हा.चेअरमण संदीप शेळके,तुषार पवार, ग्रा.सदस्य गणेश सोनवणे, मंगल शेळके, यमुना सोनवणे, सुरेखा रासकर, सपना झांबरे, कीरण सोनवणे, नंदू रणदिवे, सुमीत सोनवणे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment