शहरातील प्रत्येक विभागात योग वर्गांचे आयोजन करावे : महापौर बाबासाहेब वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 16, 2021

शहरातील प्रत्येक विभागात योग वर्गांचे आयोजन करावे : महापौर बाबासाहेब वाकळे

 योग विद्याधाम तर्फे योग शिक्षकांना प्रमाणपत्राचे वाटप

शहरातील प्रत्येक विभागात योग वर्गांचे आयोजन करावे : महापौर बाबासाहेब वाकळे

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः दि. 14/03/2021 रोजी नगरमधील योग विद्याधाम अहमदनगर येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाद्वारे घेतल्या गेलेल्या सन 2018-20019 व 2019-20207 या वर्षाच्या योग शिक्षक पदविका वर्गाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या योग शिक्षकांच्या प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीअहमदनगरचे प्रथम नागरिक महानगरपालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे उपस्थित होते.
   समवेत दत्ता दिकोंडा, संस्थापक सदस्य दिलीप कुलकर्णी, उपाध्यक्ष अंजली कुलकर्णी, सचिव माणिक अडाणे, योग शिक्षक हेमंत आयचित्ते आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना महापौर वाकळे म्हणाले की, योग विद्याधाम अहमदनगर हे प्रचार व प्रसाराचे कार्य खूप उत्तमपणे करत आहे व हे कार्य असेच सुरू रहावे, ही त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली. नियमित योगासने केल्याने मानवी आरोग्य व त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकाने योगासनांचा अभ्यास नियमित करावा व शहरातील प्रत्येक विभागात योग वर्गांचे आयोजन केल्यास शहरातील प्रत्येक नागरिकास त्याचा लाभ घेता येईल असे ते म्हणाले.
   यावेळी बोलताना प्राचार्य अडाणे म्हणाले की, 2018-20019 व 2019-20200 या वर्षांतील योग शिक्षक पदविका वर्ग यशस्वीपणे पूर्ण करणारे 90 योग शिक्षकांना प्रमाणपत्रांचे वाटप यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी परीक्षेमध्ये उत्तार्ण झालेल्या सर्व योगशिक्षकांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपमाला लांडे व वैशाली पांढरे यांनी केले. यावेळी अर्चना कुलकर्णी, प्रितम बोरुडे, डॉ. पल्लवी राऊत, शेखर पटेकर आदींनी आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे शेवटी अंजली कुलर्णी यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here