गटविकास अधिकारीवर शिस्तभंगाची कारवाई व्हावी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने अन्यथा उपोषण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 16, 2021

गटविकास अधिकारीवर शिस्तभंगाची कारवाई व्हावी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने अन्यथा उपोषण

 गटविकास अधिकारीवर शिस्तभंगाची कारवाई व्हावी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने अन्यथा उपोषण

अहमदनगर- शिस्तभंगाची कारवाई करण्याचे दोषारोप पत्र जिल्हा परिषदेने सादर करुन नऊ महिने उलटून देखील पारनेरचे तत्कालीन गटविकास अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होत नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांना पाठविले आहे.
   पारनेर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी त्यांच्या कार्यकाळात शौचालय, टँकर, पाणी, सेवावर्ग बदली, ग्रामपंचायत तपासणी अशा अनेक घोटाळ्यात अडकले आहेत. याच्या चौकशीसाठी अहमदनगर जिल्हा परिषदेने दि.25 जून 2020 रोजी दोषारोप पत्र तयार करुन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याकरिता पुराव्याचे दस्तऐवज दिले आहे. या संदर्भात अद्यापि कुठलीही कारवाई केली नसून, याला नऊ महिने होत आले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here