सर्वज्ञानी उद्योगिनी महिला विकास मंचच्या वतीने घेतलेल्या विविध स्पर्धेचा निकाल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 18, 2021

सर्वज्ञानी उद्योगिनी महिला विकास मंचच्या वतीने घेतलेल्या विविध स्पर्धेचा निकाल

 सर्वज्ञानी उद्योगिनी महिला विकास मंचच्या वतीने घेतलेल्या विविध स्पर्धेचा निकाल

गायन स्पर्धेत शर्मिला कंगे, निबंध चैत्राली वनारसे तर छायाचित्रण स्पर्धेत बबिता गांधी प्रथम

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः सर्वज्ञानी उद्योगिनी महिला विकास मंचच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला असून, यामध्ये महिलांनी आपल्या कला-गुणांचे सादरीकरण करुन बक्षिसे पटकाविली.  
    सर्वज्ञानी मंचच्या संस्थापिका आरती काळपुंड म्हणाल्या की, महिला सक्षमीकरण, सबलीकरण आणि सशक्तीकरण या त्रिसूत्रीने कार्य करण्यासाठी सर्वज्ञानी महिला मंचची स्थापना झाली आहे. महिला एकत्र आल्यास विचारांची देवाण-घेवाण होते, तर स्पर्धेच्या माध्यमातून कला-गुणांना वाव मिळत असते. महिलांनी आपल्या उत्पादनांना बाजारपेठ निर्माण करण्यासाठी एकमेकिंना सहकार्य करण्याची गरज असल्याचे सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी ऑनलाईन पध्दतीने छायाचित्रण, निबंध व गायन स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेस महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. तसेच अनेक ज्येष्ठ महिला देखील या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक एस.जी. कायगावकर, सहप्रायोजक अमित अकॅडमी आणि संचेती सारी यांचे सहकार्य लाभले.
   गायन स्पर्धेत प्रथम- शर्मिला कंगे, द्वितीय- नम्रता जहागीरदार, तृतीय- डॉ. योगिता सत्रे, चतुर्थ- सृष्टी यागनिक, उत्तेजनार्थ- लता काळपुंड, निबंध स्पर्धा- प्रथम- चैत्राली वनारसे, द्वितीय- विद्या लहारे, तृतीय- अनामिका म्हस्के, चतुर्थ- पूनम खोपटीकार, छायाचित्रण स्पर्धा- प्रथम- बबिता गांधी, द्वितीय- नीलम लोधा, तृतीय- कल्याणी भालेकर, चतुर्थ- उज्वला मुरकुटे यांनी बक्षिसे पटकाविली. स्पर्धकांना छायाचित्रणासाठी मीच माझ्या रुपाची राणी, निबंध स्पर्धेला आजची स्त्री आणि तिचे मनोगत तर गायन स्पर्धेसाठी जुनी गाणी किंवा भावगीत हे विषय देण्यात आले होते. महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन आनंद लुटला. यामध्ये  सर्वज्ञानीच्या सचिव अर्चना शिंदे, ज्योती शाह, सुचिता देवचक्के, शीतल चोरडिया यांचाही सहभाग उल्लेखनीय होता. सर्व विजेत्या महिलांना आयोजकांकडून आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment