राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने फरार आरोपी बोठेला अटक करणार्‍या पोलीस अधिकारीचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 18, 2021

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने फरार आरोपी बोठेला अटक करणार्‍या पोलीस अधिकारीचा सत्कार

 राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने फरार आरोपी बोठेला अटक करणार्‍या पोलीस अधिकारीचा सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः राज्यभर गाजलेल्या बहुचर्चित रेखा जरे खून खटल्यातील फरार आरोपी बाळ जगन्नाथ बोठे यास हैदराबाद येथून पकडून आणणार्या पोलीस पथकातील नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांचा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
   यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे, तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, पाथर्डी तालुकाध्यक्ष जगन्नाथ बर्डे, गौतमी भिंगारदिवे, महेमुदा पठाण, पुनम मेहेत्रे, नयन खांडरे, सुनिता घनवटे, स्वाती बेरड, आरती करंडे, मनीषा बेरड, आकांशा भिंगारदिवे, मोनाली वीर, श्रद्धा थोरात, अश्विनी करंडे आदी उपस्थित होते. रेखा जरे खून प्रकरणात बोठे याला जेरबंद करुन पोलीसांनी महत्त्वपुर्ण कामगिरी केली आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरु असून, लवकरच या घटने मागचे सर्व गुढ उलगडणार असल्याची भावना जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here